• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दुधोडीसह १० गावांची एसटीसाठी एकजूट ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र निवेदनांतून बससेवा सुरू करण्याची मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 10, 2026
in महाराष्ट्र
0
दुधोडीसह १० गावांची एसटीसाठी एकजूट ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र निवेदनांतून बससेवा सुरू करण्याची मागणी
0
SHARES
169
VIEWS

दुधोडीसह १० गावांची एसटीसाठी एकजूट ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र निवेदनांतून बससेवा सुरू करण्याची जोरदार मागणी

धाराशिव लोकविचार

परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी दुधोडीसह परिसरातील दहा गावांनी एकत्रित पुढाकार घेतला आहे. दुधोडी, गिरळगाव, जोतिबाचीवाडी, पारगाव, नाफरवाडी, अनपटवाडी, निपाणी, आंद्रुड, पाक्रूड आणि दिघोल येथील समस्त ग्रामस्थांनी आपापल्या ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक यांच्याकडे स्वतंत्र निवेदने सादर करून नवीन एसटी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

भाजपचे परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर यांनीही विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धाराशिव यांच्याकडे निवेदन देत दुधोडी व परिसरातील १० ते १५ ग्रामपंचायतींना जोडणारी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

भूम–वार्शी–वालवड–पाथरूड–दुधोडी–जोतिबाचीवाडी–पाक्रूड–आंद्रुड–निपाणी–जातेगाव–दिघोल–पाटोदा असा मार्ग निश्चित करून बससेवा सुरू करावी, तसेच पाटोदा येथून सकाळी सुमारे ६.३० वाजता बस सुटावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या बससेवेचा लाभ विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याने ग्रामस्थांनी एकमुखाने ही मागणी लावून धरली आहे. ग्रामपंचायतींकडून स्वतंत्र निवेदने सादर झाल्यामुळे या मागणीला अधिक बळ मिळाले असून, एसटी महामंडळाने सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर बससेवा सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

Next Post

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चा जाहीर पाठिंबा – जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चा जाहीर पाठिंबा – जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चा जाहीर पाठिंबा - जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!