• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भाजपा नेते “नितीन (बप्पा) शेरखाने पुन्हा खा.ओमराजेंच्या संपर्कात! जिल्ह्यात नव्या समीकरणांची चर्चा!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 5, 2026
in राजकारण
0
भाजपा नेते “नितीन (बप्पा) शेरखाने पुन्हा खा.ओमराजेंच्या संपर्कात! जिल्ह्यात नव्या समीकरणांची चर्चा!
0
SHARES
372
VIEWS

भाजपा नेते “नितीन बप्पा शेरखाने पुन्हा खा.ओमराजेंच्या संपर्कात! धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा!

भाजपचे मातब्बर नेते व राष्ट्रीय चर्मकार संघाचे नेतृत्व करणाऱ्या नितीन शेरखाने यांच्या भेटीने पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण…

धाराशिव लोकविचार

धाराशिवच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते तसेच राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले नितीन (बप्पा) शेरखाने यांनी आज खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव येथील संपर्क कार्यालयात भेट घेतल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

एकेकाळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे खंदे समर्थक तसेच कट्टर शिवसैनिक म्हणून नितीन शेरखाने यांची ओळख होती. मात्र नगरपरिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

त्यानंतर त्यांनी भाजपच्या संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावत पक्षासाठी सातत्याने खिंड लढवली.जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपकडून सांजा गटातून उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती.दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे.

अशा परिस्थितीत आज नितीन शेरखाने यांनी खासदारांच्या संपर्क कार्यालयात घेतलेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत चर्चांना अधिक वेग आला आहे.या भेटीमुळे नितीन शेरखाने पुन्हा ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नवी राजकीय इनिंग सुरू करणार का, याकडे धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून, येत्या काही दिवसांत त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

पालकमंत्री सरनाईकांची मोठी भेट! जिल्ह्याला मिळाल्या ३० ‘राजमाता जिजाऊ’ अत्याधुनिक बस खा. ओमराजेंच्या हस्ते लोकार्पण

Next Post

पोलिस अधिक्षकांचे आदेशही थंडबस्त्यात? आरटीओ घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास २५ ते २५ दिवसांचा विलंब, आनंदनगर पोलिसांचे काम संथगतीने!

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
पोलिस अधिक्षकांचे आदेशही थंडबस्त्यात? आरटीओ घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास २५ ते २५ दिवसांचा विलंब, आनंदनगर पोलिसांचे काम संथगतीने!

पोलिस अधिक्षकांचे आदेशही थंडबस्त्यात? आरटीओ घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास २५ ते २५ दिवसांचा विलंब, आनंदनगर पोलिसांचे काम संथगतीने!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!