• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

श्री तुळजाभवानी मंदिर जमीन प्रकरणी चौकशी आठवड्यात समिती गठीत करणार – पुजार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 4, 2026
in क्राईम
0
श्री तुळजाभवानी मंदिर जमीन प्रकरणी चौकशी आठवड्यात समिती गठीत करणार – पुजार
0
SHARES
9
VIEWS

श्री तुळजाभवानी मंदिर जमीन प्रकरणी चौकशी आठवड्यात समिती गठीत करणार – पुजार

जमिनीच्या ७/१२ वर मंदिर संस्थांची नावच नाही !

धाराशिव लोकविचार

लाखो हिंदू भाविकांचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या ४ हजार १२१ एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची आता राज्य शासनामार्फत चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात चौकशी समिती येत्या आठ दिवसात गठीत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दि.४ जुलै रोजी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. पुढे बोलताना पुजार म्हणाले की, तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला जी जमीन इनाम म्हणून दिली होती. याबाबत काही प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत तुळजापूर इनाम जमीन बाबत चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. मूलतः इनाम जमिन ही निजाम सरकारने वेगवेगळ्या मठास काही अटी आणि शर्ती टाकून दिली होती. मात्र या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर मंदिर संस्थानचे नावच नाही. मंत्री बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले असल्यामुळे त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या समितीमध्ये एक वरिष्ठ अधिकारी असेल. या चौकशीमध्ये जमीन प्रदान केलेल्या अटी व शर्तीवर त्याचे पालन होते की नाही ? याची चौकशी होणार आहे. पुढच्या आठवड्यात समिती जाहीर होईल. या चौकशीमध्ये गुंतागुंतीचे विषय लक्षात घेता सखोल चौकशी होईल, असे पुजार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिलेल्या तक्रारीनंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’ देखील लागू होत नाही, असे असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आली आहे. तर श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री ३ हजार ३९७ एकर जमीन असताना प्रत्यक्ष ताबा मात्र चार मठांमधील खाजगी व्यक्तीकडे आहे. तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करून ६३.०३ एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली. तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत २६१ एकर जमीन तब्बल ७३ खाजगी व्यक्तींच्या नावे ७/१२ वर नोंदवली. याशिवाय अपसिंगा आणि उपळा या गावांमधील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला आहे. त्यामुळे या महासंघाच्या तक्रारीची दखल घेऊन राज्य पातळीवरून याची चौकशी होत आहे. त्यामुळे या चौकशीत पुढे काय निष्पन्न होणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

Next Post

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

जनता महाविद्यालयात 'नशामुक्ती'चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!