• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 26, 2026
in राजकारण
0
स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा
0
SHARES
15
VIEWS

स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा

धाराशिव लोकविचार

महावितरणकडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र वाघमारे यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती अथवा दडपशाही थांबवावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन अधीक्षक अभियंता, महावितरण यांना देण्यात आले.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाढत्या वीजबिलांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडत असून त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय, स्मार्ट मीटर बसविण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांना नोटिसा बजावून दबाव टाकला जात असल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत. ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही कारवाई करणे अयोग्य असून अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे.

ग्राहकांची संमती घेऊनच पुढील प्रक्रिया राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा युवासेनेच्या वतीने जिल्हाभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रविंद्र वाघमारे यांनी दिला आहे.

दरम्यान, स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राज्यभर विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना धाराशिव जिल्ह्यातही हा विषय ऐरणीवर आला असून महावितरण प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

 निवेदन देताना युवा सेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे, प्रदीप साळुंके,बंडू आदरकर, पंकज पाटील,राज निकम,राणा बनसोडे, राकेश सूर्यवंशी, तानाजी जाधवर,सह्याद्री राजेनिंबाळकर,अभिराज कदम, लखन देशमुख, कालिदास शेरकर, सतीश लोंढे, प्रवीण केसकर, मंगेश काटे, अमित कोकाटे, हर्षद ठवरे, किरण बोचरे, अक्षय खळदकर, महेश गंगणे, प्रदीप पोतदार, यांचे सह युवा सेनेचे पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकयुवासेनाशिवसेना
Previous Post

यात्रा मैदानाच्या प्रश्नावर महिलांचा एल्गार मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरून अनोखे आंदोलन

Next Post

श्रेयवादाच्या राजकारणात धाराशिवच्या विकासाचा बळी? अधिकारी-कर्मचारीही संभ्रमात, जनतेच्या अपेक्षांचे काय?

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
श्रेयवादाच्या राजकारणात धाराशिवच्या विकासाचा बळी? अधिकारी-कर्मचारीही संभ्रमात, जनतेच्या अपेक्षांचे काय?

श्रेयवादाच्या राजकारणात धाराशिवच्या विकासाचा बळी? अधिकारी-कर्मचारीही संभ्रमात, जनतेच्या अपेक्षांचे काय?

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!