• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ACBची कारवाई – छेडछाड प्रकरण दडपण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोण पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा…

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 18, 2026
in क्राईम
0
ACBची कारवाई – छेडछाड प्रकरण दडपण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोण पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा…
0
SHARES
21
VIEWS

ACBची कारवाई – छेडछाड प्रकरण दडपण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोण पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा…

धाराशिव लोकविचार 

छेडछाडीच्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी आणि प्रकरण मिटवून टाकण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप शिराढोण पोलीस ठाण्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलवर सिद्ध झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), धाराशिव यांनी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने २१ मे २०२६ रोजी लेखी तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या नातवाविरुद्ध छेडछाडीचा अर्ज प्राप्त झाल्याचे सांगून त्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी आणि प्रकरण मिटवून देण्यासाठी शिराढोण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल अतुल संपत जाधव (वय ३४) यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता, पोलिस कॉन्स्टेबल जाधव यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम २३ मे २०२६ रोजी स्वीकारण्याचेही त्यांनी सांगितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.

यानंतर २३ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई आयोजित केली. मात्र, तक्रारदार व पंच यांच्याबाबत संशय आल्याने आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे प्रत्यक्ष लाच स्वीकारण्याची कारवाई पूर्ण होऊ शकली नाही.

दरम्यान, १८ जून रोजी तक्रारदाराने पुन्हा ACB कार्यालयात हजर राहून आरोपीस संशय आल्यामुळे तो पैसे स्वीकारणार नसल्याचे सांगितले आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर पडताळणीदरम्यान लाच मागणी सिद्ध झाल्याच्या आधारे आरोपी पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, तो सध्या मिळून आलेला नसल्याने त्याचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे तसेच उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय वगरे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले असून, पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे हे तपास अधिकारी आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकलाच लुचपत विभागलाचखोरशिरढोण पोलिस
Previous Post

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला धक्का? नाराज मतदार, अंतर्गत धुसफूस आणि वाढलेले टेन्शन; बसवराज पाटील यांचे गणित बिघडणार की महेश देशमुखांना लाभ होणार?

Next Post

39 युनिट वापर, पण 12 हजारांचे बिल! महावितरणाच्या गलथान कारभाराने ग्राहक त्रस्त!

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
39 युनिट वापर, पण 12 हजारांचे बिल! महावितरणाच्या गलथान कारभाराने ग्राहक त्रस्त!

39 युनिट वापर, पण 12 हजारांचे बिल! महावितरणाच्या गलथान कारभाराने ग्राहक त्रस्त!

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!