• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

इंधन दरवाढीमुळे एसटीवर १२४ कोटींचा अतिरिक्त भार तरीही तात्काळ भाडेवाढ नाही — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 18, 2026
in महाराष्ट्र
0
इंधन दरवाढीमुळे एसटीवर १२४ कोटींचा अतिरिक्त भार तरीही तात्काळ भाडेवाढ नाही — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
6
VIEWS

इंधन दरवाढीमुळे एसटीवर १२४ कोटींचा अतिरिक्त भार तरीही तात्काळ भाडेवाढ नाही — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई लोकविचार

डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असला, तरी सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करून तात्काळ प्रवासी भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मात्र, वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असून तो राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील परिवहन मंत्री यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच वाढत्या इंधन खर्चामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटी महामंडळाला दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. सध्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत डिझेलचा पुरवठा केला जात असून, मागील आठवड्यात प्रति लिटर ८८ रुपये २१ पैसे असलेला दर आता वाढून ९१ रुपये ३१ पैशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रति लिटर तब्बल ३ रुपये १० पैशांची वाढ झाली आहे.या दरवाढीचा थेट परिणाम महामंडळाच्या खर्चावर होत असून, दररोज सुमारे ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च एसटीला सहन करावा लागत आहे. मासिक स्तरावर हा आर्थिक भार सुमारे १० कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असून, वार्षिक पातळीवर तो १२४ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात महामंडळाला सुमारे ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे आर्थिक परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन विविध पर्यायांचा विचार करीत आहे.तथापि, सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार पडू नये यासाठी शासनाची भूमिका संवेदनशील असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, कोणतीही भाडेवाढ तातडीने लागू करण्यात येणार नाही.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढीच्या अनुषंगाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे सादर केला जाईल. संबंधित प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.दरम्यान, एसटी महामंडळाचा वाढता खर्च कमी करण्यासाठी इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण, महसूलवाढीच्या उपाययोजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर विशेष भर देण्यात येत असल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा#प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

Next Post

लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!