• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्टलसह दोन जण जेरबंद; देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत काडतुसे जप्त

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 9, 2026
in क्राईम
0
धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्टलसह दोन जण जेरबंद; देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत काडतुसे जप्त
0
SHARES
773
VIEWS

धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्टलसह दोन जण जेरबंद; देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत काडतुसे जप्त

बेंबळी टी-पॉईंट परिसरात सापळा रचून कारवाई; गुन्हेगारीला लगाम घालण्याच्या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत

धाराशिव लोकविचार

धाराशिव शहर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी कारवाई करत देशी बनावटीची पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे शहर व परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, धाराशिव शहर पोलिसांच्या सतर्कतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उप विभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ मे २०२६ रोजी सायंकाळी अंदाजे ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास बेंबळी टी-पॉईंट ते रुईभर दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुरनं 190/2026 अन्वये कलम 3, 25 शस्त्र अधिनियम तसेच कलम 135 मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपींमध्ये सुजित बापुराव मुंडे (वय 26, रा. उत्तमी कायापुर, ता. जि. धाराशिव, सध्या रा. माणिक चौक, धाराशिव) व विश्वजीत विजय अमृतराव (वय 32, रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचा समावेश आहे.पोलीसांनी आरोपींकडून अंदाजे ३० हजार रुपये किंमतीची स्टील सदृश्य धातूची सिल्वर रंगाची देशी बनावटीची पिस्टल, एक मॅगझिन तसेच १ हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या काडतुसांवर “KE 7.65” असा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.श्रीमंत रामराव क्षीरसागर पोना/1871 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ हे करीत आहेत.पोलीस निरीक्षक दराडे यांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात धाराशिव शहर पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नळदुर्ग शहरात तुळजापूरच्या धर्तीवर अतिक्रमण हटाव मोहीम कधी?प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष, रस्ते मोकळे करण्याची मागणी.

Next Post

शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई  ताडगाव-रांजणी शिवारात थरारक पाठलाग; बकरी चोरी प्रकरणी तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई  ताडगाव-रांजणी शिवारात थरारक पाठलाग; बकरी चोरी प्रकरणी तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त

शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई  ताडगाव-रांजणी शिवारात थरारक पाठलाग; बकरी चोरी प्रकरणी तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!