• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मालमत्ता कर अभय योजनेचा ३ हजार नागरिकांनी घेतला लाभ – काकडे नगराध्यक्ष

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 4, 2026
in महाराष्ट्र
0
मालमत्ता कर अभय योजनेचा ३ हजार नागरिकांनी घेतला लाभ – काकडे नगराध्यक्ष
0
SHARES
23
VIEWS

मालमत्ता कर अभय योजनेचा ३ हजार नागरिकांनी घेतला लाभ – काकडे नगराध्यक्ष

६ कोटी ५१ लाख ७० हजार कर वसुली तर ५ कोटी २५ लाख १७ हजार व्याज माफी मिळणार – नीता अंधारे मुख्याधिकारी

धाराशिव – लोकविचार

धाराशिव नगर परिषद अंतर्गत मालमत्ता मालमत्ता करापोटी मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम होती. मात्र दंडाची रक्कम वाढत असल्याने ती भरण्यास अनेकांना इच्छा असताना देखील आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून ऑगस्ट २०२५ पासून मालमत्ता कर अभय योजना सुरू केली. त्यास आजपर्यंत ३ हजार २५ नागरिकांनी प्रतिसाद देत ६ कोटी ५१ लाख १७ हजार ९१० रुपये मालमत्ता करांचा भरणा केला आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरणा केलेल्या नागरिकांना ५ कोटी २५ लाख ७० हजार ५९० रुपये व्याज अर्थात दंड माफी मिळणार आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के जास्तीची कर वसुली झाली असल्याची माहिती नगराध्यक्ष नेहा काकडे व मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली.धाराशिव शहरातील नागरिकांनी मालमत्ता करांचा भरणा करावा यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात होते. मात्र, त्यास नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नागरिकांना कर भरणार रकमेतून सूट मिळावी यासाठी प्रशासन कालावधीमध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दि.१३ ऑगस्टपासून मालमत्ता कर अभय योजना सुरू केली. ती योजना दि‌४ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहिली. तर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी मालमत्ता कर अभय योजना सुरू करण्यास सर्वसाधारण सभेमध्ये दि.३१ मार्चपर्यंत मान्यता दिली. त्यामुळे नागरिकांनी ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मालमत्ता कर भरणा केला आहे. या करामध्ये शिक्षण कर, रोजगार हमी उपकर, वृक्ष कर, अग्निशमन कर, दिवाबत्ती कर आदी मालमत्ता करांचा समावेश आहे. मालमत्ता कर भरणा केलेल्या नागरिकांना ५ कोटी २५ लाख ७० हजार ५९० रुपये व्याज अर्थात दंड माफी मिळण्याचा ठराव नगर परिषदेच्या सभागृहाने दि.२८ एप्रिल रोजी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देताच ती माफी दिली जाणार असल्याचे काकडे व अंधारे यांनी सांगितले. शिक्षण संस्थेच्या वसुलीचे प्रमाण अत्यल्प मालमत्ता अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील खाजगी शिक्षण संस्थांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सर्वच खाजगी शिक्षण संस्थांनी मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

मालमत्ता कर अभय योजनेचा ३० हजार नागरिकांनी घेतला लाभ – नीता अंधारे

Next Post

नळदुर्गकरांना मोठा दिलासा! २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित!

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!
महाराष्ट्र

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
Next Post
नळदुर्गकरांना मोठा दिलासा! २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित!

नळदुर्गकरांना मोठा दिलासा! २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित!

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!