• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव पोलिसांची डी जे विरोधात कारवाई.! ३ गुन्हे दाखल अनेक डॉल्बी जप्त!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 16, 2026
in क्राईम
0
धाराशिव पोलिसांची डी जे विरोधात कारवाई.! ३ गुन्हे दाखल अनेक डॉल्बी जप्त!
0
SHARES
53
VIEWS

धाराशिव पोलिसांची डी जे विरोधात जोरदार कारवाई.! डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजावर लगाम ३ गुन्हे दाखल अनेक डॉल्बी जप्त!

धाराशिव | सर्वसामान्य लोकविचार

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखत नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी धाराशिव शहर पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस आणि प्रभावी कारवाई करत ध्वनीप्रदूषणाविरोधात कडक भूमिका घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान डॉल्बी साउंड सिस्टीमचा कर्णकर्कश आवाज करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजक व संबंधित व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करत तब्बल तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.२५ ते रात्री १०.१६ या कालावधीत शहरात निघालेल्या आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान काही आयोजकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करून पारंपारिक वाद्यांऐवजी वाहनांवर (टॉप व बस) डॉल्बी डीजे सिस्टीमचा वापर केला. विशेष म्हणजे, या साउंड सिस्टीमचा आवाज निश्चित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक ठेवून कर्णकर्कश पद्धतीने वाजविण्यात आल्याचे निदर्शनास आले.या प्रकारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचा उघडपणे भंग झाल्याने धाराशिव शहर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधितांविरुद्ध डॉल्बी जप्त करीत कठोर कारवाई केली. या प्रकरणी सम्यक चिलवंत, सागर गायकवाड, अभिषेक सूर्यवंशी, सोमेश्वर मोरे, दत्ता धावारे, साई साखरे, निलेश जानराव, फैयाज पठाण, दर्शन माळाळे, विवेक भोसले, गौतम सोनवणे, प्रणव कोतवाल, सिद्धांत बनसोडे, आकाश लंके, चेतन मस्के, दयानंद पाटील, निखील मंजुळे, भगिरथ कोबरणे, फरदीन कुरेशी, संकेत पाटील, एजाज शेख, नामदेव राऊत, आमन कठारे, विशाल वाघमारे, हसन शेख, साईराज इंगळे, गोपाळ अकोळे, करण नागटिळक, किरण निकम, रोहित शिंगाडे, गोविंद ढेरंगे, देवदत्त लोमटे, प्रतिक लांडगे, अर्जुन माळाळे, संकेत बाबर, प्रविण सिरसाटे, मस्तान शेख, उमेश माने, संकेत जगदाळे, किशोर नागटिळक, अविनाश गोंगावले आदींसह अनेकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २२३, २८९, २९२, २९३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३ व १५ आणि ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.धाराशिव पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात स्पष्ट संदेश गेला आहे की, सण-उत्सव साजरे करताना कायद्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. विशेषतः ध्वनीप्रदूषणासारख्या गंभीर विषयावर पोलिसांनी घेतलेली ही कठोर भूमिका नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.दरम्यान, अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून, भविष्यातही अशा प्रकारच्या नियमभंगावर कठोर कारवाई सुरूच ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी धाराशिव पोलिसांचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव पोलिसांची डी जे विरोधात कारवाई.! ३ गुन्हे दाखल अनेक डॉल्बी जप्त!

Next Post

मंगरूळ हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधातून कट रचत पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून तिघे जेरबंद

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
मंगरूळ हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधातून कट रचत पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून तिघे जेरबंद

मंगरूळ हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधातून कट रचत पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून तिघे जेरबंद

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!