• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव येथे राज्यस्तरीय गंगाधर करंडक नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 19, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS


धाराशिव येथे राज्यस्तरीय गंगाधर करंडक नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा
27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान रसिकांना मेजवानी
कलावंत आणि रसिकांनी सहभागी व्हावे नाट्य  – विशाल शिंगाडे

धाराशिव लोकमदत न्यूज


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, धाराशिव शाखेच्या वतीने राज्यस्तरीय ‘गंगाधर करंडक’ एकांकिका नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे विविध कार्यक्रम रंगणार आहेत. या स्पर्धांमध्ये कलावंत व रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी केले.

धाराशिव येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवार दि. 19 मार्च रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव चे तालुका अध्यक्ष डी.जी.कुलकर्णी, शेषनाथ वाघ, सुगत सोनवणे, शुभम खोत, सुरेश देवकुळे, विजय उंबरे, सत्यजित माने,सारीपूत शिंगाडे, यशवंत शिंगाडे ,ताहेर शेख, विश्वनाथ काळे, सुहास झेंडे, आलम बेग यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना शिंगाडे म्हणाले की, जागतिक रंगभूमी दिन आणि स्व. गंगाधर शिंगाडे यांच्या स्मरणार्थ गंगाधर करंडक आयोजित केला जातो. या पूर्वी घेण्यात आलेल्या सहा करंडक स्पर्धांना राज्यातील नाट्य संघांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिवच्या वतीने सातव्या गंगाधर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात येत आहेत. ही स्पर्धा 27, 28 आणि 29 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह धाराशिव येथे संपन्न होणार आहे. नाट्य स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत 24 मार्च आहे.
तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव शाखेच्या वतीने भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन 30 व 31 मार्च तर कलावंताच्या मेळाव्याचे आयोजन 1 एप्रिल रोजी आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या कलावंत मेळाव्यात राज्यातील कलाकार सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्योग मंत्री मा.ना.श्री उदय सामंत , खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,आ.तानाजी सावंत, आ.कैलास पाटील , आ.प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या हस्ते होणार आहे.उद्घाटनाच्या कार्यक्रमात नाट्य परिषदेचे मध्यवर्ती कार्यालयाचे पदाधिकारी आणि कलावंत उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शेषनाथ वाघ यांनी तयार केलेल्या गंगाधर करंडक स्पर्धेच्या लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने मोफत करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तरुण-तरुणी नाट्य कलाकारांनी यामध्ये प्रवेश घेण्यासाठी व या नाट्य स्पर्धा पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.


या गंगाधर करंडक नाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या नाट्य संघास अनुक्रमे 51 हजार 990, 31 हजार व 21 हजार रुपये, चौथे बक्षीस 11 हजार तर उत्तेजनार्थ 5 हजार रुपये व गंगाधर करंडक चषक, प्रमाणपत्र आदी देऊन गौरविण्यात येणार आहे.तसेच उत्कृष्ट पार्श्वसंगीत, नेपथ्य, अभिनय स्त्री व पुरुष, प्रकाश योजना, संहिता लेखन आणि दिग्दर्शन यांनाही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

चौकट
भव्य नृत्य स्पर्धेत सहभाग घेऊन समूह नृत्य खुला गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या नाट्य संघास अनुक्रमे 21 हजार, 15 हजार व 10 हजार रुपये तर उत्तेजनार्थ 5 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. तर वैयक्तिल नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या नाट्य संघास अनुक्रमे 7 हजार, 5 हजार व 3 हजार रुपये तर उत्तेजनार्थ 2 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. तर लावणी नृत्य खुला गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या नाट्य संघास अनुक्रमे 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये तर उत्तेजनार्थ 3 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.

Previous Post

गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा दत्ता पेठे यांच्या वतीने सत्कार

Next Post

गॅस टंचाई – फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

गॅस टंचाई - फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!