• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

नळदुर्ग बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय पिण्याच्या पाण्याची सोय व २४ तास वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 15, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नळदुर्ग बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय पिण्याच्या पाण्याची सोय व २४ तास वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी

नळदुर्ग | लोकमदत न्यूज

ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या नळदुर्ग येथील बस स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे आणि रात्रीच्या वेळी वाहतूक नियंत्रक उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अझहर शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नळदुर्ग हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असून ऐतिहासिक किल्ला आणि पर्यटनस्थळामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असतात. मात्र बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने विशेषतः उन्हाळ्याच्या काळात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना तहान भागवण्यासाठी बाहेरून महागडे पाणी विकत घ्यावे लागते, जे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
याशिवाय रात्रीच्या वेळेत नळदुर्ग बस स्थानकावरून दररोज सुमारे १५ ते २० लांब पल्ल्याच्या बसेस ये-जा करतात. मात्र त्या वेळी वाहतूक नियंत्रक (टीसी) उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना बसची अचूक वेळ, प्लॅटफॉर्म किंवा मार्गाबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेकदा प्रवाशांची धावपळ होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नळदुर्ग येथील सजग नागरिक अझहर शेख यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद (धाराशिव) विभाग नियंत्रकांना लेखी निवेदन देऊन प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात बस स्थानक परिसरात तात्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी २४ तास वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन नळदुर्ग बस स्थानकावरील प्रवाशांच्या अडचणी दूर कराव्यात आणि आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिक व प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

कानफुक्या रील्स स्टारचा आणखी फुशारकीचा कारनामा आला समोर ! न.प.च्या अधिकाऱ्यांवरच दाखवला ‘फुसका रुबाब’!..

Next Post

बांधकाम कामगार योजनांतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचारावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधी आवाज उठवणार का?

Next Post

बांधकाम कामगार योजनांतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचारावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधी आवाज उठवणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.