• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

जिल्ह्यातील शिवसेना(शिंदे गट) आणि उबाठा एकाच नाण्याच्या दोन बाजू  – ॲड. नितीन भोसले

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 31, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील शिवसेना(शिंदे गट) आणि उबाठा एकाच नाण्याच्या दोन बाजू.

दोघांचीही स्क्रिप्ट एकच; विरोधक आणि मित्रपक्षाची भाषा आमच्या आरोपांना पुष्टी देणारी

-ऍड नितीन भोसले,जिल्हा प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी,धाराशिव .

उबाठाचे आमदार-खासदार यांच्या तोंडी जी भाषा होती त्याच भाषेत आमच्या मित्र पक्षाचे पदाधिकारीही आता बोलू लागले आहेत. त्यामुळे दोघांचीही स्क्रिप्ट एकाच लेखकाने लिहिली असल्याचे स्पष्ट होत आहे. पत्रकार परिषद घेणारे आमचे मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि आमचे विरोधक दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी अनेक मुद्द्यांवर दोघांचेही अज्ञान त्यांनी जगजाहीर केले आहे.

पालकमंत्र्यांच्या पत्रानंतरच शहरातील रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली, हे सर्वश्रुत असताना, “स्थगिती फडणवीस सरकारने दिली” असे वारंवार सांगणे, यातूनच विरोधक आणि आमच्या मित्रपक्षाच्या मनातील सुप्त हेतू उघड होत आहे. आम्हीदेखील याप्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचे स्वागत यापूर्वीच केले आहे. मात्र या निविदा प्रक्रियेबरोबरच खालील बाबींचीही सखोल चौकशी व्हायला हवी. ज्याबाबत उबाठाचे आमदार-खासदार आणि आमच्या मित्र पक्षातील पदाधिकारी सोयीनुसार मूग गिळून गप्प बसले आहेत.
१. ₹१४० कोटींच्या कामासाठी संभाजीनगरचा ठेकेदार कोणाच्या माध्यमातून आणला गेला?
२. त्या ठेकेदाराला काम मिळत नाही हे पाहून तत्कालीन मुख्याधिकारी फड यांच्यावर दबाव कोणी आणला?
३. मुख्याधिकारींना सहा महिने टेंडर उघडू न देण्यासाठी कोणाकडून दबाव टाकण्यात आला?
४. मुख्याधिकारी दबावाखाली येत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कोणाच्या सांगण्यावर तयार झाला?
५. गेली नऊ महिने ही प्रक्रिया रखडवण्यासाठी विविध व्यक्तींच्या माध्यमातून अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न कोणी केले?
६. ज्याला अखेर कंत्राट मिळाले, त्या ठेकेदारासोबत वाटाघाटींसाठी बैठका कोण घेतल्या?

धाराशिव शहरातील माता-भगिनींनी स्थगितीविरोधात आंदोलन केले, त्यास आमच्या पक्षाने उघड पाठिंबा दिला. त्या आंदोलनात काही भाजप महिला कार्यकर्त्या देखील समर्थनासाठी उपस्थित होत्या, याचा चुकीचा अर्थ लावून आंदोलनकर्त्यां माता-भगिनींची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे.

आम्ही पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली होती की, या विषयाबाबत आमच्या विरोधकांनी माननीय पालकमंत्र्यांना चुकीची माहिती देत त्यांचा गैरसमज निर्माण केला आहे. आज मित्र पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले मुद्दे या सगळ्या बाबींना पुष्टी देणारे आहेत. धाराशिव शहरातील जनतेला न्याय आणि दिलासा मिळेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा पाठपुरावा सुरूच राहील.

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलखासदार ओम प्रकाश राजे निंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकभारतीय जनता पक्षराजकारणराजकीय नेतेशिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा : डॉ.मृणाल जाधव

Next Post

धाराशिव शहरातील सिग्नल पुन्हा ‘दुरुस्ती’च्या नावाखाली खर्चाचा खेळ? “दर काही महिन्यांनी निविदा, पण सिग्नल मात्र कायम बंद!”

Next Post

धाराशिव शहरातील सिग्नल पुन्हा ‘दुरुस्ती’च्या नावाखाली खर्चाचा खेळ? “दर काही महिन्यांनी निविदा, पण सिग्नल मात्र कायम बंद!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.