• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 13, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत

विद्यार्थ्यांनी काढल्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या

28 जागा स्त्रियांसाठी आरक्षित

धाराशिव दि.13 ऑक्टोबर (प्रतिनिधी) मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम 2025 नुसार आज धाराशिव येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे जिल्हा परिषदेचे निवडणूक विभागनिहाय आरक्षण सोडत चिठ्ठ्या टाकून आयोजित सभेत निश्चित करण्यात आले.सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

धाराशिव जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी एकूण 55 निवडणूक विभाग आहेत. त्यापैकी 50 टक्के म्हणजे 28 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत.यामध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांची संख्या 9 असून त्यापैकी 5 जागा ह्या महिला सदस्यांसाठी आरक्षित आहे.अनुसूचित जमातीसाठी 1,नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 14 जागा असून त्यापैकी 7 महिलांसाठी आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 31 जागा असून त्यापैकी 16 जागा ह्या स्त्री सदस्यांसाठी राखीव आहे.

आजच्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटांच्या आरक्षण सोडत सभेत धाराशिव जिल्हा परिषदेच्या सर्व 55 निवडणूक विभागाच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या.अनुसूचित जातीकरिता 9 जागा आरक्षित असून त्यातील 5 जागा अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षित आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागांमध्ये सिंदफळ, काक्रंबा, शहापूर, वडगाव (सि), सांजा, डिकसळ,येरमाळा, खामसवाडी व सास्तुर या जागांचा समावेश आहे. उपस्थित विद्यार्थ्यांनी भरणीतून 5 चिठया काढल्या.यामध्ये वडगाव(सि),सिंदफळ, डिकसळ,येरमाळा, व सास्तूर हे निवडणूक विभाग अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित झाले आहे.

अनुसूचित जमातीसाठी ढोकी हा निवडणूक विभाग आरक्षित आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी वालवड, उपळा(मा), काटगाव, शिराढोण, काठी, येणेगुर, पळसप,येडशी, मोहा,लोणी,मंगरूळ,पाथरूड,तुरोरी व सुकटा या 14 निवडणूक विभागाचा समावेश असून नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी काटी, सुकटा,येणेगुर,वालवड, तुरोरी,मोहा आणि लोणी हे 7 निवडणूक विभाग आरक्षित झाले आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 31 निवडणूक विभाग आरक्षित झाले आहे.त्यापैकी 16 विभाग हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. आष्टा, तेरखेडा, ईटकुर, नायगाव, पाडोळी, बेंबळी, शेळगाव,जवळा (नि), डोंजा , अणदूर, नंदगाव,कवठा,गुंजोटी, दाळींब आणि आलुर, ईट, पारगाव, पारा, कोंड, तेर, अंबेजवळगा, केशेगाव अनाळा, जळकोट, मंगरूळ, कानेगाव, माकणी, जेवळी, बलसूर व कदेर यांचा समावेश असून  सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झालेले निवडणूक विभाग कोंड ,जळकोट, तेर मंगरूळ, ईट, बलसूर, कुन्हाळी, पारगाव, केशेगाव, माकणी, अनाळा,पारा,कानेगाव,अंबेजवळगा,कदेर व जेवळी या विभागाचा समावेश आहे.

यावेळी सोडतीने चिठ्ठया काढण्यासाठी जिल्हा परिषद मुलांची शाळा धाराशिव येथील शाबान मोबीन सय्यद, सय्यद जैन शाहीद, आरीप वाजीद सय्यद व अब्दुल्ला नवाब शेरीकर या शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने भरणीतून आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यात आल्या.यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआरक्षण सोडतजिल्हा परिषद अध्यक्षजिल्हा परिषद निवडणूक २०२५धाराशिवनिवडणूक आयोगमहाराष्ट्र
Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा गोडवा – ६ हजार भेट, १२,५०० अग्रीम आणि वेतनवाढीचा फरक देण्याचा शासन निर्णय

Next Post

कर्तव्यात कसूर, अहवाल सादर – निलंबित पोलिस निरीक्षक शेळके यांच्या अडचणीत वाढ – पोलिस अधीक्षक रितु खोखर

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

कर्तव्यात कसूर, अहवाल सादर - निलंबित पोलिस निरीक्षक शेळके यांच्या अडचणीत वाढ - पोलिस अधीक्षक रितु खोखर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!