• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे पक्षाकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन! प्रतिकात्मक रमी पत्ते खेळून ,अघोरी पूजा करून, ड्रग्ज व पैसे वाटून केला निषेध

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 11, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव ता. 11: महायुतीच्या राज्य सरकारमध्ये सहभागी मंत्र्यांना ‘कलंकित’ आणि मुख्यमंत्र्यांना ‘हतबल’ संबोधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी ( ता.11) दुपारी बारा वाजता साडेबारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी,माजी आमदार दयानंद गायकवाड, जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले.
विविध मंत्र्यांच्या भ्रष्ट व बेजाबाबदार कारभारावर प्रतिकात्मक टीका करण्यासाठी कार्यकर्त्यांनी हटके पद्धतींचा वापर केला.

आंदोलनादरम्यान, माजी कृषिमंत्री व आताचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. आंदोलनस्थळी पत्याचा डाव सुरु केला, तर पैसे व ड्रग्ज चेही प्रतिकात्मक वाटप यावेळी केले. मंत्री भरत गोगावले यांना ‘जादूटोणा करणारे मंत्री’ असे संबोधून त्यांच्या नावाने अघोरी पूजा मांडण्यात आली. ओम भट स्वाहा चा नारा देत सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर, ड्रग्ज माफियांकडून सत्कार स्वीकारल्याचा आरोप असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध करण्यासाठी ‘ड्रग्ज’ लिहिलेल्या पुड्या फेकण्यात आल्या.आंदोलकांनी हातात सरकारविरोधी घोषणा लिहिलेले फलक घेतले होते. “कलंकित मंत्री, हतबल मुख्यमंत्री” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: आंदोलनउद्धव बाळासाहेब ठाकरेउस्मानाबादओमराजेकैलास पाटीलचरसजुगारड्रग्सधाराशिव कॅसिनोशिवसेना
Previous Post

वडार समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा द्या अन्यथा मनसे करणार तीव्र आंदोलन

Next Post

परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसांचा जिल्हा दौरा

Next Post

परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसांचा जिल्हा दौरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • विधान परिषद निवडणूक: भाजप-महायुतीचा शक्तिप्रदर्शन! रणनीती पक्की, विजयावर शिक्कामोर्तब?
  • “प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांवर सरकार सकारात्मक” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
  • एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
  • विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!
  • “सहा महिने अदृश्य नगरसेवक पावसाळ्याच्या तोंडावर जागे रिल्स काढून स्वच्छतेचा दिखावा की नागरिकांची दिशाभूल?”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.