• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

फक्त ड्रोन सर्वेक्षणाने कचरा डेपोचा प्रश्न सुटणार का? ‘रिल्स’पेक्षा प्रत्यक्ष काम करा नागरिकांचा संताप!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 4, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

फक्त ड्रोन सर्वेक्षणाने कचरा डेपोचा प्रश्न सुटणार का? ‘रिल्स’पेक्षा प्रत्यक्ष काम करा नागरिकांचा संताप!

‘रील स्टार’ कानफुके स्वच्छता सभापती पुन्हा वादात कचरा डेपोवर पाहणी की केवळ प्रसिद्धीचा शो?

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरातील मध्यवस्तीमध्ये अनेक वर्षांपासून साचलेल्या कचरा डेपोच्या विल्हेवाटीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सहा महिन्यांत बायोमायनिंग प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज धाराशिव नगर परिषद यांच्या माध्यमातून नियुक्त एजन्सीकडून ड्रोन सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध कचऱ्याचे मोजमाप करण्यात आले.

या वेळी नगरपरिषदेने नेमलेली एम. के. के. कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक तसेच काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ड्रोनच्या साहाय्याने कचऱ्याचा साठा, उंची व क्षेत्रफळ यांचे मोजमाप करण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून देण्यात आली.

मात्र, प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याबाबत ठोस कारवाई झालेली नसताना केवळ पाहणी आणि ड्रोन सर्वेक्षणाने आणि केलेल्या पाहणीचे रिल्स व्हिडिओ काढून प्रश्न सुटणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील अनेक भागांतील रहिवाशांनी कचरा डेपोमुळे होणारी तीव्र दुर्गंधी, सतत निघणारा धूर आणि पेटवून दिल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

नागरिकांच्या मते, कचरा जाळल्यामुळे संपूर्ण शहरात धुराचे लोट पसरतात. श्वसनाचे आजार, अ‍ॅलर्जी तसेच गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. काहींनी तर या प्रदूषणामुळे गंभीर आजार आणि मृत्यूच्या घटना घडल्याचा आरोपही केला आहे.

दरम्यान, पाहणी दौऱ्यावेळी काढण्यात आलेल्या व्हिडिओ ‘रिल्स’मुळे नगरपरिषदेच्या रिल्स स्टार  सभापतींवर पुन्हा टीका होत आहे. “प्रत्यक्ष कामाऐवजी प्रसिद्धीचा भाग अधिक दिसतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. जनतेचा खरा कळवळा असेल तर आधी कचरा डेपोची विल्हेवाट लावावी आणि त्यानंतरच प्रसिद्धी करावी, असे मत शहरवासीयांनी व्यक्त केले.

कचरा डेपोचा प्रश्न हा शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडित असल्याने केवळ पाहणी दौरे न करता तातडीने बायोमायनिंग प्रक्रिया सुरू करून निश्चित वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतीत खरोखरच काम पूर्ण होते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

आनंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत पत्त्याच्या क्लबचा पुन्हा धुमाकूळ? उच्चभ्रू वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Next Post

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!