• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नागझरवाडीत माती-पाणी तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा, शेतकऱ्यांसाठी ‘मृदा आरोग्य तपासणी’चे हक्काचे केंद्र उपलब्ध

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 12, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

नागझरवाडीत माती-पाणी तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा, शेतकऱ्यांसाठी ‘मृदा आरोग्य तपासणी’चे हक्काचे केंद्र उपलब्ध

धाराशिव – श्रीसिद्धीविनायक परिवार धाराशिव यांच्या वतीने कळंब तालुक्यातील नागझरवाडीत येथे माती-पाणी तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. खामसवाडी येथे सुरू असलेल्या माती व पाणी परीक्षण संकलन केंद्राच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेण्यात आली. श्रीसिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक व भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. अल्प दरात माती-पाणी तपासणीची सोय उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आधार मिळतो आहे. दरम्यान नागझरवाडी येथील कार्यशाळेत बलराम कुलकर्णी आणि गजानन पाटील यांनी माती परीक्षणाच्या फायद्यांवर प्रकाश टाकला. मातीतील पोषकद्रव्य स्थिती समजल्यामुळे रासायनिक खतांचा अनाठायी वापर टाळता येतो, खतांचा खर्च घटतो, उत्पादनात वाढ होते तसेच जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवता येते, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे उद्योजक म्हणून दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी गूळ पावडर प्रकल्पाद्वारे ऊस उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली असून, माती-पाणी परीक्षण केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या समृद्ध शेतीसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यशाळेस नागझरवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विठ्ठल साळुंके, सयाजी साळुंके, नानासाहेब यादव, राम महाजन, कुमार साळुंके, प्रकाश साळुंके, मनोज साळुंके आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विजय पोफळे यांनी मानले.

Previous Post

पाच टक्के नजराणा रद्द, निवासी मालमत्ता निःशुल्क वर्ग-१ होणार…जिल्ह्यातील दोन हजार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

एम्स नागपूरच्या धर्तीवर धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

एम्स नागपूरच्या धर्तीवर धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!