• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एम्स नागपूरच्या धर्तीवर धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 13, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS


एम्स नागपूरच्या धर्तीवर धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘एम्स’चे तज्ज्ञ देणार प्राध्यापकांना प्रशिक्षण

विद्यार्थ्यांसह जिल्हा आणि परिसरातील रुग्णांनाही होणार लाभ

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर येथील एम्सचे तज्ञ आता दर पंधरा दिवसाला धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर घेणार आहे. त्याचबरोबर काही सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर दररोज एक तास त्यांचा अमूल्य वेळ रुग्ण उपचारासाठी देणार आहेत. एम्स आणि आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराच्या मसुद्याला राज्य शासनानेही आता मंजुरी दिली आहे. एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन असावे यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात जगभरात ख्याती असलेल्या एम्स संस्थेस शुक्रवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट दिली. एम्स आणि धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला. आणि दोन्ही संस्थांच्या परस्पर सहकार्याने भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर बैठकीत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. नागपूर येथील एम्सच्या सहकार्यातून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. एम्सचे अनुभवी आणि नामवंत तज्ञ त्यासाठी आवर्जून सहभागी होत आहेत. आता यापुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर पंधरा दिवसाला या तज्ञ डॉक्टरांकडून लेक्चर घेतले जाणार आहे. या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना एम्समधील तज्ञ डॉक्टरांकडून थेट मार्गदर्शन, अद्ययावत माहिती आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण लाभणार आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाही एम्ससारख्या नामांकित संस्थेत कशाप्रकारे रुग्णसेवा आणि व्यवस्थापन चालते याचे व्यावहारिक प्रशिक्षणही आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एम्समधील काही सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर दररोज त्यांचा एक तास अमूल्य वेळ रुग्ण उपचारासाठी देणार आहेत. काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी या मान्यवर सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर मंडळींचे मोठे सहकार्य लाभणार आहे. जगभरात आज घडीला मोठ्या वेगात संशोधन सुरु आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ रुग्ण तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यामुळे होणार आहे. त्यासाठी एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील अभ्यासक्रम असायला हवा यासाठीही आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. एम्सचे सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर टेलिमेडिसिनच्या माध्यमातूनही आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संपर्कात असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि अद्यावत उपचार देण्यासाठी आपल्या डॉक्टर मंडळीला मोठे सहकार्य लाभणार आहे. काही गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यासाठी एम्सने अधिकृतपणे आपल्याला मान्यता दिली आहे. आवश्यकतेनुसार काही रुग्णांना थेट नागपूर येथे नेऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. या सहकार्यामुळे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी एम्स संस्थेस भेट देऊन आढावा घेतला. तसेच भविष्यातील उपक्रमाबाबतही चर्चा केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्रसिंह चौहान,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास उपस्थित होते.

सामंजस्य कराराच्या मसुद्याला शासन मान्यता : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे अद्ययावत शिक्षण मिळावे. यासाठी नागपूर येथील एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याला जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेबांनी सभागृहातच वरील माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराचा फायदा थेट विद्यार्थ्यांसह धाराशिव जिल्हा आणि परिसरातील रुग्णांनाही होणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

नागझरवाडीत माती-पाणी तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा, शेतकऱ्यांसाठी ‘मृदा आरोग्य तपासणी’चे हक्काचे केंद्र उपलब्ध

Next Post

कंपन्यात व बँकामध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना परत द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

कंपन्यात व बँकामध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना परत द्या - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!