• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सांजा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांचा प्रचारात झंझावात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 30, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

सांजा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांचा प्रचारात झंझावात — प्रदीप घोणे व सौ. आशा राजदीप गायकवाड यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव लोकमदत न्यूज

सांजा पंचायत समिती गणांतर्गत येणाऱ्या सांजा, सकनेवाडी, देवळाली, शेकापूर तसेच चिखली पंचायत समिती गणातील चिखली, राजुरी, बोरखेडा, बोरगाव राजे, महाळंगी व मेडसिंगा या गावांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण सांजा जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती (पुरुष) राखीव असून, या गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रशासनाचा दांडगा अनुभव, उत्तम जनसंपर्क आणि कार्यक्षम नेतृत्वाची ओळख असलेले प्रदीप सुभाष घोणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंचायत समिती सांजा गण अनुसूचित जाती (महिला) राखीव असल्याने, शिवसेनेच्या वतीने सौ. आशा राजदीप गायकवाड यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे.

प्रदीप घोणे हे धाराशिव नगर परिषदेत तब्बल दहा वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत राहिले असून, प्रशासनाचा सखोल अनुभव, जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली आणि काम करून दाखवण्याची क्षमता यामुळे ते जनसामान्यांमध्ये विश्वासाचे नाव बनले आहेत. विकासकामांचा ठसा उमटवत त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर सांजा गटातील गावोगावी आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

पंचायत समिती सांजा गणात उमेदवार असलेल्या सौ. आशा राजदीप गायकवाड या 2010 पासून आजपर्यंत सलग तीन टर्म सांजा ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या राजदीप गायकवाड यांच्या पत्नी असून, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कामकाजाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. समाजातील प्रत्येक घटकांशी जोडलेपण, महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्या मतदारांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
प्रदीप घोणे व राजदीप गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गाव, वाडी, वस्ती, तांडा येथे प्रत्यक्ष भेटी देत मतदारांशी संवाद साधत ते जनतेच्या समस्या समजून घेत आहेत. त्यांच्या प्रचारसभांना व भेटीगाठींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सांजा जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2017 मध्ये sanja जिल्हा परिषद गटात धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील हे बहुमताने विजयी झाले होते. त्यामुळे यावेळीही शिवसेना आपला गड अबाधित राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदीप घोणे यांची स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षम नेतृत्व व लोकांमध्ये असलेली आपुलकी पाहता, शिवसेनेने त्यांच्यावर जिल्हा परिषद गटाची जबाबदारी सोपवली आहे.

शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष तथा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप घोणे यांना पक्षाचा bhakkm पाठिंबा असून, ते अत्यंत विश्वासू व प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली घोणे व गायकवाड यांचा प्रचार वेग घेत असून, जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सांजा, सकनेवाडी, देवळाली, शेकापूर, चिखली, राजुरी, बोरखेडा, बोरगाव राजे, महाळंगी व मेडसिंगा या सर्व गावांमध्ये शिवसेना उमेदवारांनी प्रचाराची आघाडी घेतली असून, विकास, प्रशासनातील पारदर्शकता, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगतीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. विशेषतः युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याशी थेट संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करण्यावर भर दिला जात आहे.
एकूणच सांजा जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार प्रदीप घोणे आणि पंचायत समिती सांजा गणातील उमेदवार सौ. आशा राजदीप गायकवाड यांनी प्रचारात झंझावात निर्माण केला असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जनसंपर्कामुळे विजयाची आशा अधिक बळावली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

सांजा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांचा प्रचारात झंझावात

Next Post

डॉल्बी चालकांना धाराशिव पोलिसांनी दिला जबर दणका चार डॉल्बी वाहनांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

डॉल्बी चालकांना धाराशिव पोलिसांनी दिला जबर दणका चार डॉल्बी वाहनांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!