• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

कंपन्यात व बँकामध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना परत द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 13, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कंपन्यात व बँकामध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना परत द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर



सामान्य नागरिकांनी मोठ्या कष्टाने, घाम गाळून आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न आणि सुरक्षित भविष्य यासाठी जमा केलेल्या ठेवी चिटफंड व मल्टिस्टेट संस्थांनी बुडवल्याचा गंभीर मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत अत्यंत आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारला थेट जाब विचारला.

की पल्स इंडिया लिमिटेड, समृद्ध जीवन, सहारा इंडिया लिमिटेड, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गुरुप्रसाद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या चिटफंड कंपन्यांमध्ये तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, साईराम अर्बन बँक आणि भगवान बाबा मल्टीस्टेट यांसारख्या मल्टिस्टेट संस्थांमध्ये लाखो सामान्य नागरिकांचे पैसे अडकले आहेत.

या कंपन्या व संस्थांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक उभी केली. मात्र मुदत संपल्यानंतर पैसे परत न देता अनेक संस्था बंद पडल्या, तर काहींचे संचालक फरार झाले आहेत. यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक ठेवीदार आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडले आहेत, ही बाब  सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी सरकारच्या उदासीन भूमिकेवर तीव्र टीका करत सांगितले की, “ठेवीदार न्यायासाठी वणवण फिरत असताना सरकार केवळ कागदी चौकशी आणि आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिले आहे. दोषींना संरक्षण दिले जात आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.”

धाराशिवसह महाराष्ट्र व देशातील विविध भागांत या चिटफंड व मल्टिस्टेट संस्थांमुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली असून शासनाने आतापर्यंत ठोस कृती न केल्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार  ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे ठोस भूमिका घेऊन  दोषी कंपन्या व संस्थांची सर्व चल-अचल मालमत्ता त्वरित जप्त करावी जप्त मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत ठेवीदारांच्या भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुका थांबवण्यासाठी मल्टिस्टेट व चिटफंड क्षेत्रावर कठोर नियंत्रण आणावे

ही केवळ आर्थिक फसवणूक नसून सामान्य नागरिकांच्या विश्वासाची लूट आहे. त्यामुळे सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी ठाम भूमिका खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत मांडली.

Previous Post

एम्स नागपूरच्या धर्तीवर धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! धाराशिवच्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या १०१ देशी गाईंचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण

Next Post

अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! धाराशिवच्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या १०१ देशी गाईंचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.