• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव शहरात पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त, अनेक जण ताब्यात!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 9, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव शहरात पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त, अनेक जण ताब्यात

उपविभागीय पोलीस अधिकारी व धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील पथकाची संयुक्त कारवाई

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरातील तुळजापूर रोड परिसरात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक जणांना ताब्यात घेतल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली आहे. काल सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी व धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत अचानक धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईदरम्यान जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, पत्ते, रोख रक्कम तसेच इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईच्या वेळी क्लबमध्ये उपस्थित असलेल्या अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या अवैध पत्त्यांच्या क्लबवर झालेल्या या कारवाईमुळे धाराशिव शहरातील बेकायदेशीर (अवैध) धंदेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणाची अधिकृत व सविस्तर बातमी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

महिला दिनानिमित्त नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Next Post

धाराशिव शहरातील पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई लाखोंच्या मुद्देमालासह ९ जणांवर गुन्हा दाखल 

Next Post

धाराशिव शहरातील पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई लाखोंच्या मुद्देमालासह ९ जणांवर गुन्हा दाखल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.