धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा. डॉ. प्रतापसिंह पाटील
धाराशिव – जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे तसेच घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून पूरग्रस्त गावांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे नद्या नाले व ओढे तुडुंब भरलेले असून जनजीवन विस्कळीत झालेली आहे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद पडलेले असून अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपायोजना राबवून रस्ते व पूल दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, आपत्ती व्यवस्थापन बचावकार्य पार पाडावे व पूरस्थिती नियंत्रणात आणावी अशी तातडीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786
