• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

जमीन खरवडली, विहिरीत गाळ, ड्रीपसेटही वाहून गेले पंचनामे सुरु : आ. राणाजगजितसिंह पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 16, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव (प्रतिनिधी):जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली आहे. पुराच्या पाण्यामुळे विहिरी गाळाने भरल्या आहेत तर काही ठिकाणी शेतातील ड्रिपसेटही वाहून गेले आहेत. प्रशासनाला या सगळ्या बाबींचे तातडीने पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या असून पंचनामे सुरु देखील करण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनीही आपापल्या परिसरात झालेल्या नुकसानीची तक्रार संबंधित तलाठ्यांकडे तातडीने दाखल करावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

कळंब तालुक्यातील खोंदला गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आपल्या एका सहकाऱ्याच्या अद्यापही शोध सुरूच आहे. दुर्दैवाने या शोधकार्यात अद्यापपर्यंत आपल्याला यश आलेले नाही. तेरणा धरण शंभर टक्के भरले आहे. मांजरा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. मांजरा धरणात देखील मोठ्या वेगाने पाणी दाखल होत असल्याने लवकरच मांजरा धरणही शंभर टक्के भरेल अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाला आहे. कळंब आणि परिसरातील पावसाची आकडेवारी अभूतपूर्व आहे. इटकूर परिसरात मागील चाळीस वर्षांत असा पाऊस झाला नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. इटकूर गावातील पुलावर जवळपास ५ तास दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली असल्याचे दिसत आहे. नदीकाठी असलेल्या शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. सर्व तहसीलदार आणि तलाठ्यांसोबत तातडीने संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात देखील झाली आहे. शेतकरी बांधवांनीही तलाठ्यांकडे तातडीने नुकसानीच्या तक्रारी सादर कराव्यात कराव्यात, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

अनेक भागात जनावरे दगावली असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. शेतकरी बांधवांनी नुकसानीची माहिती आणि जनावरे दगावली असल्यास याबाबतही तातडीने तक्रारी सादर कराव्यात. पुढील दोन- तीन दिवस आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. बहुतांश बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. अनेक साठवण तलाव, मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे पुढील पाऊस जास्त नुकसानकारक ठरण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी व आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणा नंतर कुठल्याही प्रशासकीय बैठकीला हजेरी न लावता तातडीने बांधावर जाऊन उद्भवलेल्या पूर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी केली. सगळी माहिती जाणून घेतली. प्रशासनाला युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Tags: अतिवृष्टीअनुदान मदतकार्य dharashiw osmanabad कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आ. राणाजगजितसिंह पाटीलकळंबकृषी विभागखोंदला
Previous Post

महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवचा सत्यजीतराजे कात्रे महाराष्ट्रात ४ था

Next Post

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद…तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेश

Next Post

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद...तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.