• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषद प्रशासनातील अंधार दूर करण्याचे अंधारे यांच्यासमोर आव्हान !

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 14, 2025
in राजकारण, सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव दि.११ (अमजद सय्यद) – शहरातील नगर परिषद प्रशासनात मागील दोन महिन्यांपासून अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच मुख्याधिकारी म्हणून कोण जबाबदारी करणार आणि कार्य तडीस नेणार ? यावर राजकीय खलबते रंगविले जात होते. अशा वादग्रस्त काळामध्ये बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी नगर परिषदेची मुख्याधिकारी म्हणून सूत्रे हातात घेतलेली आहेत.  त्यांच्यापुढे नगर परिषद प्रशासनात सूत्रता आणण्याबरोबरच अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधून त्यांची एकत्र मूठ बांधण्याचे मोठे कसरात्मक आव्हान उभा ठाकलेले आहे. कारण महिला अधिकारी अन् स्थानिक नेत्यांचे राजकारण यामुळे नवा गडी जुनेच मुद्दे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधून विश्वास निर्माण करणे गरजेचे. तर मागील परिस्थिती पाहता नगर प्रशासन कारभारामध्ये असलेला अंधार दूर करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी नूतन मुख्याधिकारी अंधारे यांच्यावर आली असून त्या कशी पार पाडतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.


धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांची प्रशासकीय कारण देत दि.३० जून रोजी बदली करण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकारी पदाचा कारभार नगर प्रशासन सहाय्यक आयुक्त त्रिंबक डेंगळे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी यापूर्वी याच नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारीपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावल्यामुळे त्यांची किमान तीन वर्षांपर्यंत अतिरिक्त प्रभारी कार्यभार सांभाळतील असा कयास राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत होता.  मात्र दि.३१ जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाने बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीता अंधारे यांची धाराशिव येथे बदली केली आणि त्यांनी दि.४ ऑगस्ट रोजी तत्काळ पदभार स्वीकारला. त्याबरोबरच नगर प्रशासनातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज पवार यांची बदली, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीनंतरचा पदभार बदल, बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता संदीप दुबे यांची बदली, आरोग्य निरीक्षक कौस्तुभकुमार घडे यांची बदली व मुख्य लेखापाल अशोक फडतरे यांची प्रशासकीय कारणास्तव झालेली बदली यासह इतर हालचालींमुळे प्रशासनात जवळपास सर्वच विभागांमध्ये नवीन अधिकारी आलेले आहेत. त्या जादुई बदलामुळे प्रशासनातील नव्या टीमसमोर आव्हाने असून धाराशिव नगरपरिषदेत अल्पावधीतच अनेक बदल झाले आहेत, अशा अनेक हालचालींमुळे प्रशासनात जवळपास सर्वच विभागांत नवे अधिकारी आले आहेत त्यामुळे नूतन मुख्याधिकारी यांना प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये समन्वय राखण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

सध्या मुख्याधिकारी अंधारे यांच्यासह कार्यरत असलेले सर्व नवीन विभागप्रमुख अधिकारी ज्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा अभियंता असलेलेले प्रदीप स्वामी यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता म्हणून दिलेली जबाबदारी त्यांच्या सोबतच नाशिक येथून बदली होऊन आलेले (“क” दर्जा) विष्णू सानप, संग्राम भापकर – पाणी पुरवठा अभियंता, रोहित मुंढे – पाणी पुरवठा अभियंता तात्पुरता पदभार वीज पुरवठा अभियंता, तनवीर जमादार मुख्य लेखा परीक्षक आणि स्वप्नील सुर्यवंशी – सहाय्यक लेखा परीक्षक , गणेश मेहर – स्वच्छता विभाग निरीक्षक या सर्वांचा समन्वय साधून त्यांची मोट बांधण्यासह सुरळीत प्रशासन चालविण्याचे मोठे आव्हान मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या समोर निर्माण झाले आहे.

Tags: dharashiwdpdckacharadepoosmanabadआंदोलननगर पंचायतनगर परिषदनगरविकासनागरिसमस्याप्रशासकप्रशासनमुख्याधिकारीमोर्चासामान्य प्रशासन
Previous Post

करजखेडा दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपी २४ तासांत गजाआड – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

Next Post

श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका – कीर्ती किरण पुजार

Next Post

श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका – कीर्ती किरण पुजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.