• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एसटीला आर्थिक बळकटी देण्यासाठी बहुआयामी योजना ५०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्नाचे लक्ष्य – प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 20, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

एसटीला आर्थिक बळकटी देण्यासाठी बहुआयामी योजना ५०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्नाचे लक्ष्य – प्रताप सरनाईक

डिझेल खरेदीत २४१ कोटींची बचत, इंधन पंप व जाहिरातींमधून महसूल वाढ सौर ऊर्जा व AI चा वापर करून खर्च नियंत्रणावर भर

मुंबई | लोकमदत न्यूज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बहुआयामी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. आज पार पडलेल्या बैठकीत महसूल वाढ व खर्च नियंत्रण या दोन्ही आघाड्यांवर ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरनाईक यांनी सांगितले की, डिझेल खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणत स्पर्धात्मक निविदा प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे कोणताही हस्तक्षेप न होता अधिक सवलतीत डिझेल खरेदी शक्य झाली असून दरवर्षी सुमारे २४१ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
महसूल वाढीसाठी एसटी आता इंधन विक्री क्षेत्रातही उतरणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राज्यभरात १०० ते ११० ठिकाणी मल्टी-मोडल इंधन पंप उभारले जात आहेत. या उपक्रमातून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून धुळे येथे असा प्रकल्प आधीच सुरू करण्यात आला आहे.
जाहिरात महसूल वाढवण्यावरही महामंडळाचा भर आहे. राज्यातील २५१ आगार व ६०० हून अधिक बसस्थानकांमधून दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटी नेटवर्कचा प्रभावी वापर करून पुढील पाच वर्षांत सुमारे २५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी हे उत्पन्न केवळ २० ते २२ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होते.
ऊर्जा बचतीसाठी सौर रूफटॉप प्रकल्प हाती घेण्यात आले असून, एसटीच्या मोकळ्या जागांवर सौर शेतीद्वारे वीज निर्मिती करून ती महावितरण कंपनीला विकण्याची योजना आहे. यामुळे दीर्घकालीन शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे.
याशिवाय, स्क्रॅपिंग प्रकल्प, चालक-वाहकांच्या ड्युटी व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अतिकालीन भत्त्यावर नियंत्रण, तसेच इतर उपाययोजनांद्वारे येत्या आर्थिक वर्षात किमान ५०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एसटीमध्ये आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि स्वावलंबन वाढवणे हेच प्रमुख ध्येय असल्याचे सांगत, या सर्व उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

Next Post

‘कला केंद्रां’च्या आड अनैतिक कारभार? विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

‘कला केंद्रां’च्या आड अनैतिक कारभार? विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!