• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाचा डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जाहीर पाठिंबा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 20, 2026
in राजकारण
0
महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाचा डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जाहीर पाठिंबा
0
SHARES
10
VIEWS

महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाचा डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जाहीर पाठिंबा

धाराशिव लोकविचार

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. महासंघाच्या वतीने १८ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, या पाठिंब्यामुळे डॉ. पाटील यांच्या उमेदवारीला शैक्षणिक क्षेत्रातील संघटनेचे बळ मिळाले आहे.महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. ऋषिकेश ताहकिक आणि राज्य संघटक डॉ. संदीप वाटेगावकर यांनी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना पाठिंबा जाहीर करणारे पत्र दिले आहे.महासंघाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, संघटना राज्यभरातील शिक्षक व पदवीधरांच्या विविध प्रश्नांसाठी, हक्कांसाठी आणि शैक्षणिक हितासाठी सातत्याने कार्यरत आहे. पदवीधरांच्या समस्या, शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर संघटना आपली भूमिका मांडत असते. या पार्श्वभूमीवर महासंघाने डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बेरोजगारी, उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी, रखडलेली नोकरभरती, शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, शिक्षकांचे प्रश्न आणि पदवीधरांचे हक्क हे महत्त्वाचे विषय आहेत. या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडणारे नेतृत्व मिळावे, अशी अपेक्षा पदवीधर आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांकडून व्यक्त होत आहे.नेट, सेट आणि पीएच.डी.धारकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाने डॉ. प्रतापसिंह पाटील यांना दिलेला पाठिंबा या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देणे, उच्चशिक्षित तरुणांच्या समस्या मांडणे आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे, या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर या पाठिंबाकडे पाहिले जात आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या उमेदवारीला विविध संघटना, शिक्षक आणि पदवीधरांचा पाठिंबा मिळत असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला अधिक गती मिळत आहे.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव LCB ची धडाकेबाज कारवाई

Next Post

रुपामाता नॅचरल शुगर्सच्या औद्योगिक प्रगतीचे सीमोल्लंघन!

Related Posts

नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;
राजकारण

नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;

October 22, 2026
भाजपला धाराशिव मोठा धक्का!
राजकारण

भाजपला धाराशिव मोठा धक्का!

October 19, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
Next Post
रुपामाता नॅचरल शुगर्सच्या औद्योगिक प्रगतीचे सीमोल्लंघन!

रुपामाता नॅचरल शुगर्सच्या औद्योगिक प्रगतीचे सीमोल्लंघन!

ताज्या घडामोडी

नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;

नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;

October 22, 2026
एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

October 22, 2026
सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

October 21, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!