• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

“श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी..सुरक्षिततेसाठी पोलीस, एसआरपीएफ, होमगार्डांचा भक्कम बंदोबस्त”

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 21, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी; सुरक्षिततेसाठी पोलीस, एसआरपीएफ, होमगार्डांचा भक्कम बंदोबस्त”


भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसर व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे काटेकोर नजर

तुळजापूर : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव-२०२५ उत्साहात पार पडणार आहे. दिनांक २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतून लाखो भाविक येणार असल्याने संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. मात्र भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मंदिर प्रशासन आणि धाराशिव पोलीस दलाने व्यापक बंदोबस्ताची तयारी केली आहे.

नवरात्र उत्सव काळात तुळजापूर शहर व परिसरात प्रचंड गर्दी उसळते. या गर्दीत चोरी, जबरी चोरी यासारख्या गुन्ह्यांना आळा बसावा तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसर, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, पार्किंग व्यवस्था इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून नियंत्रणासाठी स्वतंत्र सीसीटीव्ही कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामुळे संशयास्पद हालचालींवर त्वरित लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक २, पोलीस उपअधीक्षक १२, पोलीस निरीक्षक २१, सहाय्यक पोलीस निरीक्षक ३९, पोलीस उपनिरीक्षक ४५, पुरुष पोलीस अमलदार ८०५, महिला पोलीस अमलदार २०४, वाहतूक शाखेचे ७ अधिकारी व ५० अमलदार अशी फौज तैनात आहे. याशिवाय एस.आर.पी.एफच्या दोन प्लाटूनसह १२०० पुरुष होमगार्ड आणि २०० महिला होमगार्ड कार्यरत राहणार आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणासाठी पोलीस दलाने विशेष नियोजन केले आहे. नवरात्र महोत्सव काळात भाविकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्ष राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

तुळजाभवानी नवरात्र महोत्सव हा राज्याचा जणू सांस्कृतिक व धार्मिक उत्सव असल्याने लाखो भाविकांसोबतच संपूर्ण प्रशासनाचे लक्ष तुळजापूरकडे लागलेले आहे. “आई राजा उदो उदो”च्या गजरात भक्तीमय वातावरणात होणाऱ्या या महोत्सवासाठी केलेल्या बंदोबस्तामुळे भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाचा अनुभव घेता येणार आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv lokmadat newsdharashiv osmanabad praksah abitakardharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदआई तुळजाभवानीजिल्हाधिकारीतुळजापूरतुळजाभवानीधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनवरात्र उत्सवपोलीस बंदोबस्तभवानी ज्योतश्री तुळजाभवानी माता
Previous Post

एसटीसाठी १७,४५० कंत्राटी चालक व सहाय्यकांची भरती. २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू – परिवहन मंत्री सरनाईक

Next Post

घटस्थापनेच्या प्रांरभापूर्वीच गोड बातमी १०८ फुटी शिवभवानी शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड

Next Post

घटस्थापनेच्या प्रांरभापूर्वीच गोड बातमी १०८ फुटी शिवभवानी शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.