• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

सगुनाताई आचार्य यांच्यासह शेकडो महिलांचा आ. पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 10, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सगुनाताई आचार्य यांच्यासह शेकडो महिलांचा आ. पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश

“महिला सक्षमीकरणासाठी भाजपा हाच खरा पर्याय” – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या सगुनाताई आचार्य यांच्यासह शहरातील शेकडो महिलांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा कार्यक्रम धाराशिव येथील भाजप कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सदरील पक्ष प्रवेश हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले, भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष प्रितीताई कदम,भाजपा महिला माजी जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे मनिषा केंद्रे जिल्हा चिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला.

हा पक्षप्रवेश युवा नेते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून यावेळी शहरातील असंख्य महिलांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी प्रवेश करणाऱ्या महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
पक्षप्रवेश वेळी, वंदनाताई डोके, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सगुनाताई आचार्य यांच्या सोबत प्रवेश करणाऱ्या प्रमुख महिलांमध्ये मनिषाताई गोवर्धन, वंदना तीते, लता आगळे, स्वाती कुलकर्णी, अलका महाजन, अनुताई मगर, चंद्रकला घोडके, अमृता पवार, मंजिरी चिंचपुरकर, आरती कुलकर्णी आदींचा समावेश आहे.
या प्रसंगी आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, “महिलांना सक्षम करण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाचे असून पक्षात सर्वसामान्य महिलेलाही न्याय आणि सन्मान मिळतो. महिलांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत भाजपा त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवते. त्यामुळे भाजपा हा जनतेचा, विशेषतः महिलांचा, खरा पक्ष आहे.”
कार्यक्रमात बोलताना सगुणाताई आचार्य म्हणाल्या की, “आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महिलांचे मोठे संघटन उभे राहात आहे. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटन भाजपा मजबूत करण्यासाठी तळागाळात काम करत आहे.”
या प्रवेश सोहळ्यात युवा नेते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महिलांच्या सक्रीय सहभागामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजप आणखी बळकट होईल. पक्षाच्या विचारसरणीशी जोडलेली प्रत्येक महिला ही नव्या परिवर्तनाची दिशा ठरेल.”
भाजपच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून झालेला हा प्रवेश सध्या धाराशिवच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करणारा ठरत आहे.

Previous Post

धाराशिव मध्ये पवनचक्की कंपनीच्या केबल चोरी प्रकरणामागे “इन्शुरन्स क्लेम” महा घोटाळा!

Next Post

सर्वात युवा, धाडसी, निष्कलंक व उच्च शिक्षित कृष्णा पंडित (आबा) मुंडे मतदारांच्या गळ्यातील बनतायेत ताईत !

Next Post

सर्वात युवा, धाडसी, निष्कलंक व उच्च शिक्षित कृष्णा पंडित (आबा) मुंडे मतदारांच्या गळ्यातील बनतायेत ताईत !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.