• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

१ जुलैपासून HSRP नंबर प्लेट सक्तीची; नियमभंग करणाऱ्यांना १ हजारांचा दंड – प्रताप सरनाईक परिवहन मंत्री

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 14, 2026
in महाराष्ट्र
0
१ जुलैपासून HSRP नंबर प्लेट सक्तीची; नियमभंग करणाऱ्यांना १ हजारांचा दंड – प्रताप सरनाईक परिवहन मंत्री
0
SHARES
21
VIEWS

१ जुलैपासून HSRP नंबर प्लेट सक्तीची; नियमभंग करणाऱ्यांना १ हजारांचा दंड – प्रताप सरनाईक परिवहन मंत्री

मुंबई – लोकविचार

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून, वाहनधारकांना दिलासा देत HSRP बसविण्याची मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.यापूर्वी HSRP बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यभरातील कामाचा आढावा घेतल्यानंतर अनेक वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे वाहनधारकांनी या मुदतीचा लाभ घेत वेळेत HSRP प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले.वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी HSRP प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असल्याने वाहनांची ओळख सहज पटते आणि बनावट नंबर प्लेट्सवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढे सांगितले की, ज्या वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांवर १ जुलै २०२६ पासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल तसेच संबंधित वाहनधारकांकडून १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क (Compounding Fees) आकारण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!

Next Post

उन्हाळी परंपरांचा सुगंध अजूनही जिवंत; ज्येष्ठ महिलांकडून कुरड्या-पापड्यांची परंपरा जपली जातेय

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!
महाराष्ट्र

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
Next Post
उन्हाळी परंपरांचा सुगंध अजूनही जिवंत; ज्येष्ठ महिलांकडून कुरड्या-पापड्यांची परंपरा जपली जातेय

उन्हाळी परंपरांचा सुगंध अजूनही जिवंत; ज्येष्ठ महिलांकडून कुरड्या-पापड्यांची परंपरा जपली जातेय

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!