• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

पती-पत्नीची धारदार शस्त्रांनी क्रूरपणे हत्या करणाऱ्यासह सहभागी आरोपींना फाशी द्या ..

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 21, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चिमुकल्या मुलींसह नातेवाईकांचा आर्त टाहो

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) – तालुक्यातील करजखेडा येथील शेतकरी सहदेव व पत्नी प्रियंका पवार या दोघांची चार चाकीने धडक देऊन धारदार शस्त्रांनी वार करीत धड वेगळे करणाऱ्या आरोपींसह त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना अटक करावी. मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ते प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन चिमुकल्या मुलींसह नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर  आमच्या मम्मी – पप्पांना न्याय मिळवून द्या असा हृदय पिळवटून टाकणारा, काळीज कुर्तडणारा व मन हेलावून डोळ्यांच्या कडा अश्रूच्या धारांनी आपोआपच घळघळा ढासळविणारा हृदयस्पर्शी हंबरडा फोडीत व आक्रोश करीत आमच्या मम्मी – पप्पांना न्याय मिळवून द्या या मागण्यांसाठी दि.२१ ऑगस्ट रोजी आंदोलन केले. दरम्यान, या समर्थनार्थ १८ ग्रामपंचायती व स्वराज्य संघटनेच्यावतीने सर्व आरोपींना  मकोका कायद्यान्वये गुन्हे दाखल करून सर्वांनाच फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा ठराव घेऊन चिमुकल्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथील सहदेव पवार व त्यांची पत्नी प्रियांका या पती-पत्नीचा दि.१३ ऑगस्ट रोजी करजखेडा येथील चौकात असलेल्या कृषी दुकानातून शेती पिकास फवारणी करण्यासाठी लागणारी औषधे खरेदी करण्यासाठी ते पती-पत्नी मोटारसायकलवरुन  चालले होते. चौकात आल्याबरोबर चार चाकी गाडीने धडक देऊन त्यांच्यावर अंगावर हरिबा यशवंत चव्हाण व जीवन हरीबा चव्हाण यांनी धारदार शस्त्र कोयत्याने सपासप वार करीत प्रियंका यांचे शीर व धड वेगळे केले. तर सहदेव यांच्यावर १०-१५ वार करून जाग्यावरच जीवे ठार मारले. त्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या खुनाच्या कटामध्ये सहभागी असलेल्या व हे पती-पत्नी मोटारसायकलवरुन कुठे चालले आहेत, कुठपर्यंत आले आहेत ? याची इथंभूत माहिती फोनद्वारे देणाऱ्या इतर सर्व सहभागी आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे सर्वांना अटक करून त्यांच्यावर मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे. तसेच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यामध्ये सहदेव व  प्रियंका आराध्या व संजना या दोन चिमुकल्या मुलींसह त्यांच्या आई लिलावती भागवत पवार, वडील भागवत पवार, हिराबाई साळुंके, मैनाबाई लोटकर, रंजना मोहाळे, प्रणिता साळुंके, अनिता साळुंके, ललिता साळुंके, सविता साळुंके, राधिका गुरटुकने, विजया गायकवाड, स्वाती चव्हाण, मैना थोरात, कविता साळुंखे, केशरबाई मोहाळे, अंकीता सुरवसे, मनिषा मोहाळे, वर्षा लोटकर, सरस्वती साळुंके, राऊबाई साळुंके, रुक्‍मीन पवार, सुभाष साळुंके, दिलीप साळुंके, आकाश साळुंके, शाहूराज साळुंके, कविता साळुंके, महेश साळुंके, लक्ष्मण सुर्यवंशी, बबन मोहळे, संभाजी मुसांडे आदींसह इतर सहभागी झाले होते.



प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यासह आरोपींना फाशी देण्यात यावी असा ठराव १८ ग्रामपंचायती घेतला आहे. तर स्वराज्य संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी देखील तसाच ठराव घेऊन पवार यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या ग्रामपंचायतमध्ये लोहारा तालुक्यातील धानोरी, माकणी, काटी चिंचोली, तोरंबा, करवंजी, राजेगाव, एकोंडी (लो), कोंडजी (गड), मुर्शदपूर, चिंचोली (रेबी), होळी, सालेगाव, सास्तुर, खेड, हराळी, हिप्परगा (सय्यद), लोहारा (खुर्द) व तावशी (गड) यांचा समावेश आहे.

Tags: crimedharashivhatyamurderosmanabadpoliceकरजखेडाखूनपाटोदाबेंबळी पोलिस
Previous Post

तुळजाई कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार ! केंद्र तात्काळ बंद करण्याची रिपाइंची मागणी

Next Post

धाराशिव शहराच्या मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्त्यांची कामे तत्काळ सुरु करा आ कैलास पाटील

Next Post

धाराशिव शहराच्या मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्त्यांची कामे तत्काळ सुरु करा आ कैलास पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.