• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा गोडवा – ६ हजार भेट, १२,५०० अग्रीम आणि वेतनवाढीचा फरक देण्याचा शासन निर्णय

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 13, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा गोडवा — ६ हजार भेट, १२,५०० अग्रीम आणि वेतनवाढीचा फरक देण्याचा शासन निर्णय
मुंबई : राज्यातील सुमारे ८५ हजार एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा, पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये सण अग्रीम देण्याचा आणि २०२० ते २०२४ दरम्यानच्या वेतनवाढीचा फरक दरमहा वेतनासोबत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शासनाने सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी सुमारे ५१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. तसेच २०२० ते २०२४ या कालावधीत झालेल्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यासाठी शासनाने दरमहा ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय, सण अग्रीम म्हणून पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये देण्यासही शासनाने परवानगी दिली असून त्यासाठी एसटी महामंडळाने ५४ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.
“एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत,” असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
या निर्णयामुळे एसटी महामंडळातील सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या काही महिन्यांपासून मागणी असलेल्या सणभत्त्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा विशेष उजळून निघणार आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsjilhadhikari dharashivउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकमहायुती सरकारमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमुंबई
Previous Post

निमजाई न्युएरा प्रा. लि. धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.