• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवला नुकसानीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर
एकाचवेळी पंचनामे व ऑगस्टमधील अनुदान वाटपाचे काम वेगाने सुरु

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 25, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिवला नुकसानीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर
एकाचवेळी पंचनामे व ऑगस्टमधील अनुदान वाटपाचे काम वेगाने सुरु

धाराशिव : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये विशेषतः मागील चार दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी संकलित झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ७०६ हेक्टवरील पिके व फळबागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एक हजार ४८ घरांची पडझड झाली असून २०७ जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील ३६३ गावांसह एक लाख ९८ हजार ३७५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने वेगाने हाती घेतले आहेत.
एकाच वेळी पंचनामे व ऑगस्टमधील शासनाकडून मंजूर अनुदानाचे वाटप करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम गतीने सुरु आहे. पंचनाम्यानंतर भरपाईसाठी तातडीने निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून ऑगस्टमधील अनुदान वाटप आजपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली. मागील चार दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख दोन हजार ८३९ हेक्टवरील जिरायती, २१ हजार ४४२ हेक्टवरील बागायती व दोन हजार ४२५ हेक्टवरील फळपिकांचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला तर सर्वात कमी झळ कळंब तालुक्याला बसली आहे. परंडा तालुक्यातील ५२ हजार पाचशे शेतकऱ्यांच्या ३७ हजार जिरायत, १९ हजार बागायती तर दोन हजार शंभर फळपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून २०७ जनावरे मृत्यू पावले आहेत. दुधाळ जनावरांची संख्या मोठी असून त्यात १६५ मोठी तर ३६ लहान जनावरांचा समावेश आहे. अन्य सहा जनावरे ओढकाम करणारी असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.
——-
हजाहून अधिक घरांची पडझड
——
एक हजार ३७ कच्च्या घरांची पडझड झाली असून सात घरे संपूर्ण पडली असून चार गोठ्यांनाही अतिवृष्टीची बाधा पोहचली आहे. सार्वजनिक मालमत्तेचीही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यात पंधरा तलाव फुटूले असून बारा रस्ते व तीन पुलांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे १६ गावांचा संपर्क तुटला होता. आता तो पुर्ववत झाला आहे. विविध ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या ४९८ नागरिकांची एनडीआरएफ, लष्कराचे पथक, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी शोध व बचाव कार्य करुन सुटका केली आहे. या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जिल्ह्याती परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत असून जिल्हा प्रशासन पंचनामे तसेच अनुदान वाटपाच्या कामावर लक्ष ठेवून आहे. येत्या काळात पावसाचा अंदाज गृहित धरुन शोध व बचाव कार्यासह अन्य उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले. 
———
तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज
———-
तालुका – बाधित शेतकरी – बाधीत गावे – बाधीत क्षेत्र हेक्टरमध्ये
धाराशिव – २६ हजार – ५४ – ४४ हजार ६०
तुळजापूर – ३७ हजार – ४८ –  ३९ हजार ८५०
उमरगा – ५१ हजार ३४५ – ८१ –  ५४ हजार २०६
लोहारा –  ६ हजार – ११ – ७ हजार ६९०
भूम – २२ हजार – ३० – १७ हजार ३२०
परंडा – ५२ हजार ५०० – ९१ – ५८ हजार १००
कळंब – २३० – २५ – ३३०
वाशी –  ३ हजार ३०० – २३ – ५ हजार १५०
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsधाराशिव atiwrushthi madat अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालय dharashiv osmanabadधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

भाजपा शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा………शुभेच्छा जाहिरात

Next Post

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, कागदोपत्री पंचनाम्यांची नाही – उद्धव ठाकरे

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, कागदोपत्री पंचनाम्यांची नाही - उद्धव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!