• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

डॉल्बी चालकांना धाराशिव पोलिसांनी दिला जबर दणका चार डॉल्बी वाहनांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 30, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉल्बी चालकांना धाराशिव पोलिसांनी दिला जबर दणका चार डॉल्बी वाहनांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड

धाराशिव शहर पोलीस निरीक्षक दराडे यांचा दणदणाटमुक्त दरारा

धाराशिव लोकमदत न्यूज 

कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक कार्यक्रमाला डॉल्बी, डीजे वाद्यांचा कर्णकर्कश व गगणभेदी दणदणाट करण्याची परंपरा सर्रास फोफावत चाललेली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण व पर्यावरण प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. असाच प्रकार धाराशिव शहरात देखील सुरू होता. त्यामुळे संबंधित सहा डॉल्बी, डीजे वाद्य चालकांसह वाहनांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी चार डॉल्बी, डीजे वाद्य वाहनांवर प्रत्येकी १० लाख असा ४० लाख रुपयांच्या हमी रक्षण बंद पत्रावर व अटी शर्तीवर तात्पुरते ताब्यात देण्याचा आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश आर डी गायकवाड यांनी दि.३० जानेवारी रोजी दिले आहेत. तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओ अधिकाऱ्यांनी संबंधित डॉल्बी डीजे, साऊंड सिस्टम व वाहनांवर ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
त्यामुळे डॉल्बी डीजे चालक व मालक यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.६ जानेवारी २०२६ रोजी धाराशिव शहरातील हजरत खॉजा शमशोद्दीन गाजी (रहे) यांच्या उरसानिमित्त धाराशिव शहरात डॉल्बी डीजे लावण्यात आले होते. मात्र या डॉल्बी चालकांनी डॉल्बींना ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात आवाज सोडल्याने संपूर्ण शहरात दणदणाट घुमत होता. त्यामुळे ध्वनी प्रदूषण व पर्यावरण प्रदूषण झाल्यामुळे संबंधित डॉल्बी, साऊंड सिस्टिम व वाहनावर धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रणव राजेंद्र तांबे रा. सातारा यांचे ४०७ टाटा टेम्पो क्रमांक एम.एच.११ टी – ५५२५, सौरभ सुरेश खामकर रा. शिरुर – पुणे यांचे टाटा ट्रक क्रमांक एम.एच. ११ ए.एल. – ०७१९, गणेश रामदास मिरगी रा. सातारा यांचे टाटा ट्रक क्रमांक एम.एच. ११ बी.एल. – ७४७५ व संतोष किसन मेघावत रा. पुणे यांचे टाटा ट्रक वाहन क्रमांक एम.एच. ४६ ई – १४८४  तसेच साऊंड सिस्टम चालक सागर संभाजी शिंदे रा. कोल्हापूर यांच्यासह संबंधित वरील चार वाहने दि.६, ७ व‌ ८ जानेवारी रोजी ताब्यात घेतली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदूषण कलम ३, ४, ५ व ६ तर पर्यावरण संरक्षण कलम ३ व ४ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २९३, २८९, २९२ व २२३  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित वाहन मालक व चालक यांच्या विरोधात धाराशिव येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये तपास अहवाल (चार्जशीट) दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर टी गायकवाड यांनी वरील सर्व डॉल्बी व साऊंड सिस्टम आणि वाहनांवर कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक करण्यावर कायमची बंदी घातली आहे. तसेच प्रत्येकी १० लाख रुपये अशी एकूण ४० लाख रुपयांच्या हमी रक्षण बंद पत्रावर व अटी शर्यतीवर तात्पुरती ताब्यात दिले आहेत. विशेष म्हणजे दिलेल्या अटींमध्ये यापुढे ती डॉल्बी, डीजे व साऊंड सिस्टम आणि वाहन कोणालाही विकता येणार नाही. त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करता येणार नाही. तसेच न्यायालय जेव्हा आदेश देईल तेव्हा त्यासंबंधी डीजे डॉल्बी चालक मालकांनी व वाहनधारकांनी हजर करावी लागणार आहेत. ते वाहन कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी वापरता येणार नाही. याबरोबरच त्या मालमत्तेची अर्जदारांनाच सर्व दृष्टिकोनातून देखरेख व संभाळ करावा लागणार आहे.   तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने अनुक्रमे १४५००, १९५००, १७५०० व २२५०० असा एकूण ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली व धाराशिव उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने केली. या पथकामध्ये धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहाळ, अक्षय दिघोळे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर माळी आणि राम कनामे यांचा समावेश होता. न्यायालयाच्या आदेशामुळे यापुढे धाराशिव शहरात कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बी वाजणारच नाही असा संदेश या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना डॉल्बीपासून होणाऱ्या त्रासातून कायमस्वरूपी मुक्तता मिळणार असून डॉल्बीमुक्त शहर होईल असा अंदाज जाणकारातून वर्तविण्यात येत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

सांजा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांचा प्रचारात झंझावात

Next Post

डोंजा जिल्हा परिषद गट शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ

Next Post

डोंजा जिल्हा परिषद गट शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.