• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची बैठक उत्साहात संपन्न नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 7, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची बैठक उत्साहात संपन्न

नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा

महाविकास आघाडी करून लढण्याचा निर्धार

धाराशिव (प्रतिनिधी):
नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची पहिली बैठक ‘वेदबाग निवासस्थानी’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हाध्यक्षपदाच्या बदलानंतर झालेल्या या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि नवचैतन्य पाहायला मिळाले. महाविकास आघाडी करूनच सर्वांनी लढाव अशी इच्छा सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बोलून दाखवली.

या बैठकीला शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध प्रभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खलिफा कुरेशी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच विविध प्रभागांमधून जवळपास ६० इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी आपली मागणी जिल्हा नेतृत्वासमोर मांडली.

बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपली रोखठोक मते मांडली व पक्ष नेतृत्वाने आगामी काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शेखर घोडके, इस्माईल शेख, रवि ठेंगल, आणि ॲड. योगेश सोन्ने-पाटील यांनी आपली मते मांडली.

ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “आगामी निवडणुकांसाठी सर्व अर्थाने तयार राहा, पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की,

> “कार्यकर्ता सक्षम झाला तरच पक्ष सक्षम होईल. कार्यकर्ता हा आपल्या पक्षाचा श्वास आहे. आगामी काळात प्रत्येकाला पक्षाच्या गरजेनुसार जबाबदारी दिली जाईल आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे राहू. ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो त्या ठिकाणी महाविकास आघाडीतून ती जागा आपल्याकडे कशी राहील या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे निश्चितपणे प्रयत्न केले जातील असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष आयाज शेख यांनी केले. बैठकीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने पक्ष मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीतून धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश प्रतिनिधी मसूद शेख, तालुकाध्यक्ष श्याम घोगरे, शहराध्यक्ष आयाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान पठाण, वाजेद पठाण, माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉ. सेल जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, नगरसेवक बाबा मुजावर, इस्माईल शेख, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, युवक शहराध्यक्ष रणवीर इंगळे, ज्योती माळाळे, अमोल सुरवसे, युवक प्रदेश सचिव आदित्य पाटील, प्रदेश सचिव रोहित बागल, युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंकज भोसले, लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. योगेश सोन्ने-पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष दत्ता पवार, उपाध्यक्ष रवि ठेंगल, लीगल सेल कार्याध्यक्ष अविनाश जाधव, तसेच मृत्युंजय बनसोडे, गजानन खर्चे, सुरज वडवले, अस्लम शेख, ज्ञानेश्वर निंबाळकर, गयास मुल्ला, अभिजीत काळे, मजर शेरीकर, एजाज काझी, अजिंक्य हिबारे, सरफराज कुरेशी, अनवर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsosmanabadजिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटीलधाराशिवमहाराष्ट्रराजकारणराजकीय नेतेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
Previous Post

राजकीय द्वेशापोटी विलास लोंढे व बिभीषण लोंढे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल मात्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Next Post

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मोठा आरोप – दारू प्रकरणात आर्थिक तडजोडीचा आरोप उघडकीस! संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

Next Post

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मोठा आरोप – दारू प्रकरणात आर्थिक तडजोडीचा आरोप उघडकीस! संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.