• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 5, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

हागरी पाणंद उमर मोहल्ला परिसरात कारवाई चक्री जुगार पुन्हा डोके वर काढत असल्याने नागरिकांची कठोर कारवाईची मागणी

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरात पुन्हा डोके वर काढत असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर धाराशिव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत ऑनलाइन चक्री मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. ४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास हागरी पाणंद परिसरातील इरफान शेख यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेवर छापा टाकला. या छाप्यामध्ये टीव्ही स्क्रीनवर येणाऱ्या आकड्यांच्या आधारे ऑपरेट होणारा मटका जुगार सुरू असल्याचे आढळून आले.
यावेळी पोलिसांनी सोहेल फारुक बागवान (वय २२, रा. आझाद चौक, धाराशिव), इरफान इस्माईल शेख (रा. उमर मोहल्ला, धाराशिव), रंजित सुभाष चौधरी (रा. जुनी गल्ली, धाराशिव), अझहर पाशा पठाण (रा. उमर मोहल्ला, धाराशिव) व सोहेल गौस शेख (रा. उमर मोहल्ला, धाराशिव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ऑनलाईन चक्री मटका जुगाराचे साहित्य व एकूण ४५ हजार २०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, धाराशिव शहरात मागील अनेक महिन्यांपासून बंद पडलेले चक्री जुगार पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न काही जुगार चालकांकडून होत असल्याचेही समोर येत आहे. अधिक पैशाचे आमिष दाखवून नागरिकांना लुटण्याचा प्रकार या माध्यमातून होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
यापूर्वी पोलिसांनी अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत अनेक चक्री बंद केल्या होत्या. मात्र कालांतराने प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा फायदा घेत काही ठिकाणी पुन्हा चक्री जुगार सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तुळजापूर नाका, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक तसेच जुना बस डेपो पाठीमागील वीटभट्टी परिसरातही अशाच प्रकारचे जुगार सुरू असल्याची चर्चा असून या ठिकाणीही पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जुगार चालकांचे जाळे उध्वस्त करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, हागरी पाणंद परिसरात झालेल्या या कारवाईचे खाजा नगर परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काळातही पोलिसांनी अशाच पद्धतीने अवैध जुगारांवर कठोर कारवाई करत शहरातील चक्री जुगारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

Next Post

धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण आणि दर्जेदार रुग्णसेवेसाठी कामे वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post

धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण आणि दर्जेदार रुग्णसेवेसाठी कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!