• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीस जन्मपेठ… कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 15, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव (प्रतिनिधी)- पत्नीच्या हत्याप्रकरणी आरोपी पतीस सबळ पुरावा व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरून कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विठ्ठल संगापुरे यास जन्मठेप व 5 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील रांजणी येथील आरोपीचे शेत गट क्रमांक 140 मध्ये त्यांच्या राहत्या पत्राच्या शेडमध्ये 1 मार्च 2022 रोजी ही हत्याची घटना घडली आहे. यातील आरोपी नामे विठ्ठल आप्पा संगापुरे (वय 57 वर्षे, रा. रांजणी, तालुका कळंब) हा व त्यांची पत्नी त्यांच्या रांजणी शिवारातील पत्राच्या शेडमध्ये राहण्यास होते. मागील 15 दिवसापासून तो त्यांची पत्नी नामे मंगल विठ्ठल संगापुरे हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिला शेडच्या बाहेर जावू देत नव्हता. तसेच तिला कोणाशी बोलू देत नव्हता. तसेच तो तिला तुला जिवे ठार मारतो अशी धमक्या देत असल्याने आरोपीचा मोठा मुलगा नामे बाळासाहेब विठ्ठल संगापुरे हा तेथे झोपण्याकरिता जात होता. परंतु दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजीच्या रात्री तेथे झोपण्यासाठी गेला नसल्याने यातील आरोपी विठ्ठल आप्पा संगापुरे याने पत्नी मंगल विठ्ठल संगापुरे हिच्यावर असलेल्या चारित्र्यावरील संशयावरून रागाच्या भरामध्ये कोयत्याने पत्नी मंगल झोपेत असताना तिच्या हातावर, गळ्यावर मारून तीस गंभीर जखमी केले व तिला जीवे ठार मारले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 58/22 शिराढोण पोलिस स्टशेनमध्ये फिर्यादी परमेश्वर विठ्ठल संगापुरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी एपीआय नेटके व उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.
सदरील प्रकरणामध्ये सरकारपक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी परमेश्वर विठ्ठल संगापुरे व बाळासाहेब विठ्ठल संगापुरे हे फितुर झाले होते. सदरील प्रकरणामध्ये शकेला दगडू शेख व हाजू इस्माईल शेख यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजण पुरावे व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विठ्ठल संगापुरे यास जन्मठेप व 5 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashivdharashiv osmanabadजिल्हा व सत्र न्यायालयधाराशिव
Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात

Next Post

धाराशिव बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम… उद्घाटन होऊन चार महिने उलटले तरी प्रवासी-कर्मचाऱ्यांचे हाल कायम

Next Post

धाराशिव बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम... उद्घाटन होऊन चार महिने उलटले तरी प्रवासी-कर्मचाऱ्यांचे हाल कायम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.