• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मोटरसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश…

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 18, 2026
in क्राईम
0
मोटरसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश…
0
SHARES
232
VIEWS

मोटरसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश…

धाराशिव लोकविचार 

मोटरसायकलवरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, परंडा पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणे परंडा गुन्हा क्रमांक ३६२/२०२६, कलम ३०९, ११५(२), ३(५) बीएनएस या गुन्ह्यातील गेलेला माल व आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. पथक पेट्रोलिंग करत असताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा अनिल भिमा पवार याने त्याच्या साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अनिल भिमा पवार याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या तीन साथीदारांसह केलेल्या लुटमारीची माहिती दिली.

आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात परंडा हद्दीतील दुधी शिवारात मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका पुरुष व महिलेला अडवून मारहाण करण्यात आली होती. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेण्यात आले होते.

याशिवाय, तीन महिन्यांपूर्वी सोननगरी शिवारात एका महिलेला अडवून मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची माहितीही आरोपीने दिली. चोरी केलेले सोन्याचे दागिने व मोबाईलबाबत पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने ते आपल्या वाटणीला आले असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिस पथकाने आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या वाटणीला आलेले सोन्याचे दागिने, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईमुळे परंडा पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडवून लुटमारी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांमध्येही दिलासा व्यक्त होत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके तसेच पोलीस अंमलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बाबन जाधवर, पुष्कर मुंगळे, चापोह/मेहबूब अरख, सुभाष चव्हाण, प्रकाश बोईनवाड, रणनवरे व आरसीपी पथकातील अंमलदार यांनी केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतचोरीदरोडादरोडेखोरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलिसभूम परंडा वाशीरोड रॉबरी
Previous Post

जीवनज्योत महिला ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात;

Next Post

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!