• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 11, 2026
in क्राईम
0
कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’!
0
SHARES
401
VIEWS

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’! सहा दिवसांच्या विलंबावर आता एसपी मॅडम ऍक्शन मोडवर? ‘मोठे मासे’ गळाला लागणार का?

कळंब लोकविचार

कळंबमधील एमडी ड्रग्ज प्रकरणात तिसऱ्या संशयिताला अटक झाल्यानंतर आता वरिष्ठ पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षकांनी कळंब प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आज कळंब येथील प्रभारी अधिकारी यांच्यासह प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांना बोलावून घेत झाडाझडती घेतल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आय जी) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल महत्त्वाची मानली जात आहे.

कळंब शहरातील एक शिष्टमंडळ आय जी यांची भेट घेऊन ड्रग्स प्रकरणी निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मात्र, या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न कायम आहे—४ ऑगस्ट रोजी एमडी ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर काल, १० ऑगस्ट रोजी लखन गायकवाड याला अटक करण्यासाठी तब्बल सहा दिवस का लागले?सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या दिवशी मूळ कारवाई झाली त्या दिवशी लखन गायकवाड हा संबंधित आरोपींसोबत असल्याचे सांगितले जात आहे.

असे असेल तर त्याच्यावर तत्काळ कारवाई का झाली नाही? सहा दिवसांचा विलंब नेमका कशामुळे झाला? हा स्थानिक पोलिसांच्या तपासातील विलंब आहे की त्यामागे अन्य काही कारण होते? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

दरम्यान, कळंबमधील ड्रग्ज प्रकरण केवळ तीन आरोपींपुरते मर्यादित आहे की यामागे मोठी पुरवठा साखळी आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

‘मोठे मासे’ गळाला लागतात का, ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, यावरच पुढील कारवाईची खरी दिशा स्पष्ट होणार आहे.

पोलीस अधीक्षकांनि अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन घेतलेली झाडाझडती! आणि या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे कळंब ड्रग्ज प्रकरणाला आता नवे गांभीर्य प्राप्त झाले आहे.

आता कारवाई केवळ छोट्या माशांपुरती राहणार की ड्रग्जच्या मुळापर्यंत पोहोचून ‘मुख्य मासा’ जाळ्यात येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकदसंपादक : अमजद सय्यद | 083900 88786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’.!

Next Post

‘माऊली’ प्रकरणावर प्रशासन गप्प?१४ ऑगस्टला आमरण उपोषण

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
‘माऊली’ प्रकरणावर प्रशासन गप्प?१४ ऑगस्टला आमरण उपोषण

‘माऊली’ प्रकरणावर प्रशासन गप्प?१४ ऑगस्टला आमरण उपोषण

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!