• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 5, 2026
in महाराष्ट्र
0
‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’
0
SHARES
53
VIEWS

‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ ‘संध्याकाळी ७ ते ९ – अभ्यासासाठी दोन तास’ उपक्रमाची राज्यभर चर्चा धाराशिव जिल्हा परिषद घडवतेय शिक्षणाची नवी लोकचळवळ

धाराशिव लोकविचार विद्यार्थ्यांमधील वाढता स्क्रीन टाईम कमी करून अभ्यासाची सवय रुजविणे, कुटुंबातील संवाद वाढविणे आणि सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेला ‘संध्याकाळी ७ ते ९ – अभ्यासासाठी दोन तास’ हा अभिनव उपक्रम आता संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिक्षणासाठी समाज एकवटल्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे.धाराशिव जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ७१२ ग्रामपंचायतींमध्ये दररोज सायंकाळी ७ वाजता भोंगा वाजवून नागरिकांना दोन तासांसाठी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यास करत असून, पालकही मुलांसोबत बसून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे घराघरांत शिक्षणाला प्राधान्य देणारे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या उपक्रमाला केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर पालक, शिक्षक, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांमध्ये कुटुंबांनी मोबाईलमुक्त क्षण अनुभवत त्याचे सेल्फी आणि संदेश सोशल मीडियावर शेअर केले असून, इतर गावांनाही या मोहिमेत सहभागी होण्याची प्रेरणा दिली आहे.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते, भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिक्षणाला समाजाची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.’आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ या व्यापक संकल्पनेचा भाग असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय विकसित करण्याबरोबरच कुटुंबातील संवाद वाढविणे, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे अभ्यासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसू लागले आहेत.शिक्षणासाठी समाजाने एकत्र येऊन उभारलेले हे लोकचळवळीचे मॉडेल आता राज्यासाठी आदर्श ठरत असून, भविष्यात देशातील इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचा हा अभिनव प्रयोग शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडविणारा उपक्रम म्हणून व्यापक पातळीवर कौतुकास पात्र ठरत आहे.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

डी जे चालकांना ध्वनी प्रदूषणाविरोधात मोठा दणका!

Next Post

२० ऑगस्टला धाराशिवात मातंग समाजाचा एल्गार!

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
२० ऑगस्टला धाराशिवात मातंग समाजाचा एल्गार!

२० ऑगस्टला धाराशिवात मातंग समाजाचा एल्गार!

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!