• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 16, 2026
in आरोग्य
0
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
0
SHARES
13
VIEWS

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

तुळजापूर लोकविचार

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील विविध रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेचे माजी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी बुधवारी मुंबई येथील मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली.

यापूर्वी सुमारे आठ दिवसांपूर्वी अमोल जाधव यांनी मंत्री आबिटकर यांना निवेदन देत तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने रुग्णसेवेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या करण्याची मागणी केली होती.

या निवेदनाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत अमोल जाधव यांनी पुन्हा एकदा हा विषय मंत्री आबिटकर यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढील आठ दिवसांच्या आत तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेल्या विविध अधिकाऱ्यांच्या पदांवर नियुक्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती अमोल जाधव यांनी दिली.

या आश्वासनामुळे तुळजापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अनेक दिवसांपासून रिक्त असलेली पदे भरली गेल्यास रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मंत्री स्तरावर सकारात्मक आश्वासन मिळाल्याने येत्या काही दिवसांत तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील विविध रिक्त पदांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नियुक्त्या झाल्यास रुग्णालयातील कामकाजाला गती मिळून रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरउस्मानाबादतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

Next Post

प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर

Related Posts

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;
आरोग्य

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;

September 19, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
आरोग्य

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

September 6, 2026
भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील
आरोग्य

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

July 22, 2026
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ
आरोग्य

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

July 22, 2026
आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

February 13, 2026
आरोग्य

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

January 26, 2026
Next Post
प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर

प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!