• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 18, 2026
in राजकारण
0
लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
0
SHARES
4
VIEWS

डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये हालचालींना वेग

लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार ) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडे करण्यात येत आहे.

आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, २४ मे ते १ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) ला मिळावी आणि त्या माध्यमातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांत व्यापक जनसंपर्क असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याचे बोलले जात आहे. मागील निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळे यावेळीही ही जागा पक्षाकडे कायम राहू शकते, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून सक्षम, संघटनात्मक ताकद असलेला आणि जनसंपर्कात आघाडीवर असलेला उमेदवार दिल्यास ही जागा सहज जिंकता येऊ शकते. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्याकडे आवश्यक राजकीय अनुभव, कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी भावना पक्षांतर्गत व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मजबूत ठेवण्यात डॉ. प्रतापसिंह पाटील यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटन उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून सक्षम कार्यकारिणी निर्माण केली. तसेच धाराशिव नगरपालिकेत आठ नगरसेवक निवडून आणण्यातही त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कार्यकर्ते सांगतात.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आजही अनेक समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे दिसून येते. त्यामुळे यावेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिल्यास ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजय मिळवू शकतात, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

लोकवीचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

इंधन दरवाढीमुळे एसटीवर १२४ कोटींचा अतिरिक्त भार तरीही तात्काळ भाडेवाढ नाही — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

दुचाकींसाठी ‘MH25BL’ मालिका लवकरच सुरू ; आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
दुचाकींसाठी ‘MH25BL’ मालिका लवकरच सुरू ; आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

दुचाकींसाठी ‘MH25BL’ मालिका लवकरच सुरू ; आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!