• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

ध्वनीप्रदूषणा विरोधात आनंदनगर पोलिसांची धडक कारवाई; आदेश धाब्यावर बसवणाऱ्या डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 17, 2026
in क्राईम
0
ध्वनीप्रदूषणा विरोधात आनंदनगर पोलिसांची धडक कारवाई; आदेश धाब्यावर बसवणाऱ्या डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल
0
SHARES
187
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ध्वनीप्रदूषणाविरोधात आनंदनगर पोलिसांची धडक कारवाई; आदेश धाब्यावर बसवणाऱ्या डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल

धाराशिव लोकविचार

छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाजात डॉल्बी सिस्टीम वाजविणाऱ्या संबंधित आयोजक व डीजे चालकांविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्याने कठोर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.या धाडसी आणि जनहिताच्या कारवाईमुळे आनंदनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दि. १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेच्या सुमारास धाराशिव शहरातील छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये काही डॉल्बी सिस्टीम चालकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहनांवर टॉप व बस डॉल्बी साउंड सिस्टीम लावून अत्यंत तीव्र व कर्णकर्कश आवाजात ध्वनीप्रक्षेपण केले. यामुळे ध्वनीप्रदूषण नियमांचा भंग झाला तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

या प्रकरणी आरोपीत तिरुपती रामेश्वर उघडे (रा. शिक्षक कॉलनी, धाराशिव), झेड ऑडिओ कळंब येथील डीजे ऑपरेटर साहिल सखाराम भुंडे (रा. बावधन, पुणे), ओंकार भानुदास वाघमारे (रा. रामनगर, धाराशिव), के. पिंपरी चिंचवड पुणे येथील डीजे ऑपरेटर चैतन्य रामदास काळोखे (रा. देवगाव रोड, पिंपरी चिंचवड), तसेच आयुष अनिल तोडकरी (रा. मारवाड गल्ली, धाराशिव) आणि ए.के.जी. कर्वेनगर पुणे येथील डीजे ऑपरेटर अभिषेक युवराज डांगे (रा. झुंजार मित्र मंडळ, कर्वेनगर, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर आरोपींविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम २२३, २८९, २९२, २९३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३ व १५ आणि ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर व त्यांच्या पथकाने केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांना ध्वनीप्रदूषणापासून दिलासा देण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

जुना राष्ट्रीय महामार्ग त्वरित सुरू करा; महाविकास आघाडी आक्रमक, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

Recent Posts

  • येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
  • धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा
  • कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
  • एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

Recent Comments

  1. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Randy WebDev on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.