• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 13, 2026
in महाराष्ट्र
0
जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात
0
SHARES
27
VIEWS

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

धाराशिव लोकविचार

सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दि.१२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यासाठी ३७४४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर केले आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाकडून धाराशिव जिल्ह्यासाठी ८४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटर केरोसिनचे तालुकानिहाय वाटप अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजना शिधापत्रिकाधारकांसाठी सर्वसाधारण प्रमाणात निश्चित करण्यात आले आहे.त्यानुसार धाराशिव तालुक्यास २० हजार लिटर, तुळजापूरला ११ हजार लिटर, लोहारा ७ हजार लिटर, उमरगा १३ हजार लिटर,परंडा ९ हजार लिटर,भूम ८ हजार लिटर, कळंब ११ हजार लिटर आणि वाशी तालुक्यास ५ हजार लिटर केरोसिनचे नियतन देण्यात आले आहे.

दरम्यान,मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटरपैकी १२ हजार लिटरचा पहिला टँकर आज १३ मे रोजी जिल्ह्यात दाखल झाला असून, धाराशिव तालुक्यापासून केरोसिन पुरवठ्यास सुरुवात करण्यात येणार आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.स्वाती शेंडे यांनी केरोसिन टँकरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून जिल्ह्यातील केरोसिन वाटपाचा शुभारंभ केला.

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना हे केरोसिन प्रति लिटर ६३ रुपये दराने उपलब्ध होणार असून,प्रति कार्ड ३ लिटरप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे.हे नियतन प्राधान्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना आणि त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभ योजना शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.धाराशिव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी आपल्या केरोसिन किंवा रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन केरोसिन खरेदी करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव जिल्हाधिकारीलोकविचार
Previous Post

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी

Next Post

आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!
महाराष्ट्र

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
Next Post
आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!

आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!