• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

बदलीचे आदेश निघूनही काही पोलीस कर्मचारी जुन्याच ठिकाणी..! विशेष पोलीस महानिरीक्षकांचा अधिकाऱ्यांना जाब..!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 23, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव, दि. २३ (अमजद सय्यद) :धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिनांक ३० मे २०२५ रोजी जिल्ह्यातील बदलीच्या स्थितीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र या आदेशानंतर काहीच दिवसांत जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाली आणि त्याजागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर खोकर यांनीच कर्मचाऱ्यांचे अंतिम बदलीचे आदेश जारी केले.

या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या नवीन पदस्थानी तात्काळ हजर होणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यातील काही कर्मचारी आजही जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे कर्मचारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांना सोडण्यात आले नसल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे.

याबाबतचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी थेट उपस्थित केला. दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव येथे गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी धाराशिव येथे आलेल्या मिश्र यांनी जिल्हा प्रभारी पोलीस अधीक्षक व अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट शब्दांत जाब विचारला.! “बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना इतका दिवस का थांबवण्यात आले? बदलीचे आदेश काढल्यानंतर तत्काळ त्यांना नवीन पदस्थानी पाठवणे बंधनकारक आहे. मग हे कर्मचारी अजून जुन्याच ठिकाणी का कार्यरत आहेत?” असा जाब त्यांनी खडसावून विचारल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले असल्याचेही समजते. तसेच “जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना कामासाठी बोलवू शकता, मात्र सध्या ते कर्मचाऱ्यांना मूळ बदलीच्या ठिकाणी सोडणे अत्यावश्यक आहे” असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात सध्या प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आणि जिल्ह्यात ‘लेडी सिंघम’ म्हणून परिचित असलेल्या शपकथ आमना या आता विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी करून बदली झालेले कर्मचारी तत्काळ त्यांच्या नवीन पदस्थानी सोडतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घडामोडींमुळे जिल्हा पोलीस दलामध्ये एकप्रकारे खळबळ उडाली असून, बदली आदेश राबविण्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Tags: dharashivganeshotsawosmanabadकर्मचारी बदलीक्राईमधाराशिव जिल्हा पोलीसपोलीस दलप्रशासकीय बदलीविशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर
Previous Post

गणेशोत्सवासाठी सांजा रोडवरील वाहतुकीत बदल करण्याची भाजपकडून मागणी

Next Post

महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल ऊर्जा राज्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली बैठक

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल ऊर्जा राज्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!