• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ : शाळा,टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 20, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ : शाळा,टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम
धाराशिव,दि.१९ जानेवारी (प्रतिनिधी): रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.

शाळेत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन १३ जानेवारी रोजी श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय,धाराशिव येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी बहीर यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी Walk on Right नियम, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व,वेग मर्यादेचे पालन,मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच विविध रस्ता चिन्हांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा विषयक प्रश्नमंजुषा घेण्यात येऊन पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आणि माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

तामलवाडी टोल नाक्यावर मोफत आरोग्य शिबीर

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत धाराशिव–सोलापूर महामार्गावरील तामलवाडी टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे,सहायक पोलिस निरीक्षक गोकूळ ठाकूर, वाहतूक पोलीस कर्मचारी,IRB चे सावंत,तामलवाडी टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते.

अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ची पाहणी व उपाययोजना

१४ जानेवारी रोजी सोलापूर –तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभाग,महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस व तामलवाडी टोल नाका प्रशासनाच्या वतीने अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) पाहणी करण्यात आली.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते माळुंब्रा दरम्यान सातत्याने अपघात घडत असल्याने या परिसराची सखोल पाहणी मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे, IRB चे सुपरवायझर ज्योतिलिंग सावंत,पी.डी. शाहू व नितीन भोसले यांनी केली.

यावेळी सुरतगाव,वडगाव–काटी, सांगवी–काटी,मुक्तीनगर,गोंधळवाडी पाटी,कदमवाडी या ‘डेंजर झोन’ ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत टोल नाका प्रशासनाला निर्देश देण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक श्री.सुनील शिंदे यांनी सांगवी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून सभेमध्ये रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

Tags: #धाराशिव #उस्मानाबाद
Previous Post

नळदुर्ग नगरपरिषद भाजपाचे नूतन नगराध्यक्ष धरणे आप्पा व उपनगराध्यक्ष नयर पाशा जागीरदार यांचा अल्पसंख्याक मोर्चाकडून सत्कार

Next Post

तुळजापूर तालुक्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का… माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंचसाह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

Next Post

तुळजापूर तालुक्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का... माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंचसाह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.