• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 3, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई | दि. ३(प्रतिनिधी):राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या मोकळ्या जागांवर आणि बसस्थानकांच्या तसेच कार्यशाळांच्या छतांवर ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाद्वारे दरवर्षी सुमारे ३०० मेगावॉट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपयांची वीज निर्मिती करून एसटीला आर्थिक बळकटी देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई येथे झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळाच्या मालकीच्या मोकळ्या जागांचा उपयुक्त वापर करून ‘सौर ऊर्जा शेती’ विकसित केली जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे एसटी स्वतःची वीज निर्मिती करेल आणि भविष्यातील वीज खर्चात मोठी बचत होईल. सध्या एसटी महामंडळ दरवर्षी १५ मेगावॉट वीज वापरतो ज्यासाठी सुमारे २५ ते ३० कोटी रुपये खर्च येतो. परंतु, भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगासाठी  सुमारे २८० मेगावॉट वीजेची गरज लागणार असून, ही वीज सौरऊर्जेतून तयार केल्यास एसटीला दरवर्षी सुमारे १ हजार कोटी रुपयांची बचत होईल.”
सरनाईक पुढे म्हणाले की, “एसटी महामंडळाचा हा ‘सौर ऊर्जा हब’ प्रकल्प राज्यासाठी एक पथदर्शक मॉडेल ठरेल. यामुळे एसटी केवळ प्रवाशांच्या सेवेसाठीच नव्हे तर हरित ऊर्जा निर्मितीतही आघाडीवर राहील.”
परिवहन मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत.
दररोज नवे निर्णय, नव्या कल्पना आणि प्रशासनातील वेगवान हालचालींमुळे सरनाईक यांनी आपल्या कार्यकाळात कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
कर्मचारी वर्गासाठी कल्याणकारी योजना, बससेवा सुधारणा, प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ, तसेच पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून त्यांनी परिवहन मंत्रालयात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsउपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेएसटी महामंडळधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकमहायुती सरकारमहाराष्ट्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई
Previous Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

Next Post

पवनचक्की उभारणीतील ‘मध्यस्थां’चा सुळसुळाट थांबवा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

पवनचक्की उभारणीतील ‘मध्यस्थां’चा सुळसुळाट थांबवा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!