• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 21, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

धाराशिव – आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घरटी, शिवारं आणि गोठे वाहून नेले होते. मात्र या वेदनेच्या काळातही त्यांच्या डोळ्यांत पुन्हा नवजीवनाची चमक आणणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे वाहून गेली आहेत अथवा मृत पावली आहेत, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ दुभती गोवंश जनावरांची दिवाळी भेट दिली जाणार आहे!

नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. *यावेळी बोलतांना मंत्री सरनाईक म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार प्राध्यापक सतीश मातने (सर) यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे पत्र  लिहिले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या साथीदार असलेल्या दुभतु जनावरे अवकाळी पावसाच्या महापुरामध्ये वाहून गेली तर काही मृत पावली त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या संसाराचा आर्थिक कणाच कोलमडून पडला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी दुपती जनावरे द्यावी, अशी संकल्पना त्यांनी मांडली.*

      अर्थात, दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरनाईक कुटुंबांकडून विशेष भेट दिली जाते. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देणाऱ्या आपल्या नेतृत्वाला आगळया- वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भेट द्यावी या उद्देशाने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे महापुरामध्ये वाहून गेली, अशा शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याकरिता त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणून १०१ दुभती गोवंश जनावरे भेट देऊन शेतकरी कुटुंबांच्या जीवनात नवचैतन्य फुलविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

या प्रसंगी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,
“आसमानी संकटाने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले  पिकं, भांडीकुंडी, संसारातील लहानसहान वस्तूंसह त्यांच्या उपजीविकेचा आधार असलेली जनावरंही वाहून गेली. शेतकऱ्यांचा संसार पुन्हा उभा राहावा, म्हणून आम्ही त्यांना दुधाळ गोवंश भेट म्हणून देत आहोत. या जनावरांच्या माध्यमातून त्यांचा संसार नव्याने बहरो, हीच आमची खरी दिवाळी भेट आहे.”
ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांचा संसार फक्त सरकारी मदतीवर उभा राहणार नाही. आपण सर्वांनी समाजभावनेतून पुढे येऊन त्यांना हात द्यावा. कारण शेतकऱ्याला उभं करणं म्हणजे आपल्या भूमीचं, आपल्या अन्नदात्याचं पुनर्जन्म घडवणं आहे.”

या अनोख्या दिवाळी उपक्रमामुळे धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. काळ्या ढगांनी व्यापलेले आकाश आता उजळले आहे आशेचा दीप पुन्हा पेटला आहे.“ही फक्त दिवाळी भेट नाही, तर एका उद्ध्वस्त संसाराला पुन्हा सजीव करण्याचा पवित्र संकल्प आहे,” असं या उपक्रमाचं सार सांगत धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आता नव्या उमेदीनं नवजीवनाचं स्वागत करत आहेत.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsअतिवृष्टी अनुदान मदतकार्यआपत्तीग्रस्त शेतकरीकर्जमाफीधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदत कार्य
Previous Post

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत…एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

Next Post

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली  परवाना रद्द केला तरी गौरी व कालिका कला केंद्र चालु

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली  परवाना रद्द केला तरी गौरी व कालिका कला केंद्र चालु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!