• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव पुरस्थितीचा आढावा…मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाण्यात उतरून पाहणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर चर्चेत

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 24, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव पुरस्थितीचा आढावा; मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाण्यात उतरून पाहणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर चर्चेत
धाराशिव दि.२४ (अमजद सय्यद):धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे भूम, परांडा,वाशी तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन उध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर या स्वतः नागरिकांच्या परिस्थितीची जाण घेण्यासाठी उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे, पाहणीदरम्यान जेव्हा मंत्री महाजन यांनी गुडघ्याच्या वर असलेल्या पाण्यातून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला, त्याच वेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनीही पाण्यात उतरून त्यांच्यासोबत ग्रामस्थांच्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाच्या जबाबदाऱ्या (कायदा व सुव्यवस्था) पार पाडताना नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी दाखविलेली ही तत्परता आणि खंबीर साथ नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे मंत्री महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये विश्वास आणि दिलासा निर्माण झाला आहे. केवळ नेतेच नव्हे तर प्रशासनही नागरिकांच्या मदतीसाठी थेट मैदानात उतरले आहे, याचे जिवंत उदाहरण पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या कार्यशैलीतून दिसून आले.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, तातडीने मदतकार्य सुरु करणे आणि पुनर्वसन प्रक्रियेत प्रशासनाची सक्रिय भूमिका यामुळे धाराशिवकरांमध्ये एक आश्वासक संदेश पोहोचला आहे. आपत्तीसमयी गुडघाभर पाण्यात उतरून परिस्थितीचा थेट आढावा घेणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newspolice adhikshakअतिवृष्टीआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनओला दुष्काळकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवजिल्हाधिकारी धाराशिवधाराशिवधाराशिव जिल्हाधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरंडापोलीस अधीक्षकभूमवाशी
Previous Post

अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या धाराशिव जिल्ह्यात

Next Post

शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही
सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Next Post

शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही
सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.