• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

घटस्थापनेच्या प्रांरभापूर्वीच गोड बातमी १०८ फुटी शिवभवानी शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 21, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

घटस्थापनेच्या प्रांरभापूर्वीच गोड बातमी १०८ फुटी शिवभवानी शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड

प्राप्त १४ प्रतिकृतींमधून तज्ज्ञांची समिती करणार निवड


कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे १०८ फूट उंचीचे भव्य शिल्प साकारण्यासाठी पाच प्रतिकृतींची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीची सोमवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील शिल्पकारांनी सादर केलेल्या एकूण १४ शिल्प प्रतिकृतींपैकी पाच प्रतिकृतींची निवड समितीकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर अष्टभुजा ‘शिवभवानी’चा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी विचार सर्व भाविकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.’मित्र’चे उपाध्यक्ष तथा तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून या शिल्पाची उभारणी केली जात आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याअंतर्गत तुळजाभवानी मातेचे १०८ फुट उंचीचे ब्राँझ धातूचे शिल्प साकारण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असतानाचे हे शिल्प असणार आहे. हे शिल्प कसे असावे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत शिल्पकारांना अडीच ते तीन फूट उंचीचे फायबरचे मॉडेल कला संचालनालयाकडे (मुंबई) १ ते ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्या प्रसंगावर हे शिल्प उभारण्यात येणार आहे, त्याचे धार्मिक, एेतिहासिक महत्व मोठे आहे. त्यातील बारकावे अधीक गांभीर्याने समजून घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिल्पकारांनी केली होती. त्यानुसार १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. दरम्यान १४ प्रतिकृती प्राप्त झाल्या आहेत. या १४ शिल्पांतून ५ शिल्प निवडण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती.
प्राप्त झालेल्या १४ शिल्पांतून ५ शिल्पांची निवड करण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता मुंबईतील कला संचालनालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांनी निवडलेल्या शिल्पाची प्रतिकृती श्री तुळजाभवानी मंदिर समितीच्या कार्यालयात सादर करण्यात यावी, असे पत्रही श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केले आहे.

ख्यातनाम तज्ञांचा इतिहासकारांचा समितीत सहभाग

तुळजाभवानी मातेच्या धार्मिक आणि अध्यात्मिक लौकिकाला साजेसे शिल्प साकारण्यासाठी ख्यातनाम तज्ञांसह नामांकित इतिहासकारांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश वडजे, मुंबई येथील सर जे.जे. कला. वास्तुकला व अभिकल्प विद्यालयाचे प्रभारी कुलसचिव शशिकांत काकडे, सेवानिवृत्त प्रा. नितीन मेस्त्री, प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे (पुणे), मुंबईतील शिल्पकार अजिंक्य घोलकर, तुळजापूरचे तहसीलदार तथा तुळजाभावनी मंदिर समितीचे विश्वस्त अरविंद बोळंगे आदींचा या समितीत समावेश असणार आहे.

संग्रहालयासह माहिती केंद्रही उभारले जाणार

या नियोजित भव्य शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे  प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेत असलेला अद्वितीय आणि अनुपम देखावा देखील अनुभवता येणार आहे. हे शिल्प श्रद्धा आणि प्रेरणेचे रोमांचक प्रतीक असणार आहे.हे प्रेरणादायी आणि भव्य शिल्प ३ मजले इमारती एव्हढ्या आकाराच्या बेसमेंटवर उभारले जाणार आहे.या बेसमेंटच्या आता एक संग्रहालय व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.तसेच २० एकर जागेवर आकर्षक बगीचा करण्यात येणार आहे, सोबत आकर्षक प्रकाश योजना केली जाणार आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: bhavani jyotdharashiv lokmadat newsdharashiv osmanabadMandirmashaltuljabhawanituljapur तुळजाभवानी तुळजापूर धाराशिव उस्मानाबाद जिल्हा न्यायालयvikas arakhadaआई तुळजाभवानीजिल्हाधिकारी धाराशिवधाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

“श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी..सुरक्षिततेसाठी पोलीस, एसआरपीएफ, होमगार्डांचा भक्कम बंदोबस्त”

Next Post

बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारणाऱ्या भावाचा निर्दयी खून – कुटुंबीयांचा एसआयटी चौकशी व पुनर्वसनाचा इशारा

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारणाऱ्या भावाचा निर्दयी खून – कुटुंबीयांचा एसआयटी चौकशी व पुनर्वसनाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!