• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

येडशीतील युवक शेतकरी दगडू देशमुख यांचा भरदिवसा खून; येडशी–सोनेगाव रस्त्यावर मृतदेह आढळला, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 13, 2026
in Uncategorized
0
0
SHARES
4
VIEWS

येडशीतील युवक शेतकरी दगडू देशमुख यांचा भरदिवसा खून; येडशी–सोनेगाव रस्त्यावर मृतदेह आढळला, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

धाराशिव लोकविचार

धाराशिव तालुक्यातील येडशी येथे रविवारी घडलेल्या खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. येडशी येथील युवक शेतकरी दगडू बाबासाहेब देशमुख (वय अंदाजे ३०) यांचा अज्ञातांनी खून केल्याची घटना समोर आली आहे. त्यांचा मृतदेह येडशी–सोनेगाव रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली.

पुरावे संकलित करण्यासाठी डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून विविध अंगांनी तपास सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार, दगडू देशमुख हे मोटारसायकलवरून आपल्या गावी जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, खून नेमका कोणत्या कारणातून झाला, त्यामागे वैयक्तिक वाद, जुने वैर की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.तपासादरम्यान देशमुख यांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात असून, खून होण्यापूर्वी त्यांचा कोणाशी संपर्क झाला होता का, ते कोणासोबत प्रवास करत होते का, त्यांच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड, संदेश तसेच अन्य तांत्रिक बाबींचीही पडताळणी केली जात आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि घटनास्थळावरील भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओहाळ तसेच आरसेवाड, सावंत, भांगे, पडवळ, चिलवंत आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे.या खूनप्रकरणामुळे येडशीसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू केला असून, लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Previous Post

धाराशिव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई २५.३६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व स्कॉर्पिओसह जप्त

Next Post

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

Related Posts

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
Uncategorized

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!

August 10, 2026
Uncategorized

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर

July 29, 2026
आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले
Uncategorized

आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले

July 28, 2026
विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन
Uncategorized

विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

June 20, 2026
आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!
Uncategorized

आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!

May 14, 2026
Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह तात्काळ दुरुस्त करानाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह द्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाट्य परिषदेची मागणी

April 24, 2026
Next Post
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; "झाडे लावा, झाडे जगवा"चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!