• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह तात्काळ दुरुस्त करानाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह द्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाट्य परिषदेची मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 24, 2026
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह तात्काळ दुरुस्त करानाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह द्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाट्य परिषदेची मागणी

धाराशिव : धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवार 12 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,धाराशिव जिल्ह्यात गेल्या सुमारे १८ वर्षांपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. पारंपरिक कला जोपासण्या बरोबरच आराधी, वाघ्या मुरळी भारूड, भजन यांसारख्या लोककला प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम शाखेमार्फत केले जात आहे. तसेच, सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत धाराशिवचे नाव राज्यस्तरावर झळकवले आहे.दरवर्षी ‘गंगाधर करंडक’ या नावाने राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन तसेच लोकनृत्य स्पर्धाही शाखेमार्फत घेतल्या जातात. मात्र, शहरातील नाट्यगृहाची दुरवस्था असल्याने कलाकारांना सादरीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत. नाट्यगृहात स्वतंत्र हॉल देण्याबाबत यापूर्वीही अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली असून त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाची तात्काळ दुरुस्ती करून नाट्य परिषदेसाठी एक स्वतंत्र हॉल उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा कलाकारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे, सुगत सोनवणे, बाळू माने, दयानंद साबळे, ताहेर शेख, अविनाश शिंगाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.चौकटअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव शाखेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये नाट्यगृह दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. निधी मंजूर केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव शाखेच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Previous Post

सर्वसामान्य लोकविचार चा इम्पॅक्ट! धाराशिव जिल्हा झाला ‘कला केंद्रमुक्त’ जिल्हा

Next Post

धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ

Next Post
धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ

धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ

Recent Posts

  • लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा….
  • २००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
  • पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता शिवसेना (उ.बा.ठा.) स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला
  • धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ
  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह तात्काळ दुरुस्त करानाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह द्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाट्य परिषदेची मागणी

Recent Comments

  1. Gunner SEO on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Darrell Camarillo on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Hassan Clint on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Brittany Joslyn on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. John Loh on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.